यावल दि.28(सुरेश पाटील) तालुक्यातील शेळगाव बॅरेज कडे जातानाचा पिंप्री हा मुख्य रस्ता सन २००८ पासून डांबरीकरण झालेला नाही.तरी आमचा पिंपरी गावाचा रस्ता काम मंजुर होऊन मिळावा अशा मागणीचे निवेदन पिंपरी ग्रामपंचायत सरपंच मोहन एकनाथ सपकाळे यांनी काल मंगळवार दि. 27 रोजी जळगाव येथे मा. ना. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेऊन दिले.
पिंपरीगाव यावल येथून ७ कि.मी अंतर असून भालशीव- पिंपरी ते यावल एकच रस्ता मुख्य असल्यामुळे शाळेच्या
मुलांची खुप गैरसोय होत असते.पावसाळ्यात बस बंद
असल्यामुळे म्हातारे लोक व शाळकरी मुले यांचे खुप हाल होत असतात त्यामुळे
तुमच्या प्रयत्नाने पिंपरी रस्त्याचे डांबरीकरण काम झाले तर बरं होईल.असे दिलेल्या निवेदनात पिंपरी सरपंच मोहन एकनाथ सपकाळे यांनी म्हटले आहे, यावल तालुक्यातील पिंपरी रस्ता हा डायरेक्ट मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या दालनापर्यंत तक्रारीच्या रूपाने पोहोचल्याने मुख्यमंत्री साहेब आता हे कोणत्या योजनेतून कोणत्या विभागामार्फत काम करतात याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे राजकारणाचे आणि ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.



