यावल (सुरेश पाटील)
आज दि. २८/६/२०२३रोजी यावल येथील जे टी महाराज इंग्लिश स्कुल मधे आषाढी एकादशी निमित्ताने दिड्डी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दिड्डी मध्ये विठ्ठल रुक्मिणी,निवृत्तीज् ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तसेच भिंत चालवणारे ज्ञानेश्वर यांचे सजीव देखावे करण्यात आले होते त्याचप्रमाणे मोठ्या विद्यार्थीनी लेझीम,डबेल्स, टिपरे,टाळ,यांच्या तालावर हरीनामाच्या गजर त्याच प्रमाणे मोठ्या विद्यार्थ्यांनी काठी आखाड्याचे खेळ खेळले,मुलिंनी वारकरी फुगड्या खेळल्या.
हे सर्व आयोजन शाळेच्या प्राचार्य सौ.रंजना महाजन व प्राचार्य किरण खेट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले दिड्डीसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले व मोठ्या उत्साहात दिड्डी शाळेतून मेन रोड मार्ग महाजन गल्ली विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला दिंड्डिमध्ये पोलीस कर्मचारी प्रशासकांनी देखील अनमोल असे सहकार्य केले.



