तसेच बाल दिंडीची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष हेमंत झटकार सर व सौ.सविता झटकार मॅडम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन विठ्ठलाचे पुजन व पालखीपुजन करून बाल दिंडीची सुरवात करण्यात आली.
विठ्ठलाच्या वेषभुषेत हितेश लोणारी व रुखमीणी च्या वेषभुषेत परी चौधरी हे विद्यार्थी होते. त्यावेळी वृक्षदिंडी रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबवण्यात आले .चिमुकल्यांनी विठू नामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. [ads id="ads2"]
जीनीयस किडस अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता झटकार मॅडम व शिक्षक वृंदाने फेर धरून फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रिंगण अश्व मिरवणूक होती.
पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते , तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या.
पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाहण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विठ्ठल रखुमाई वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी पाऊले चालती विठठल नामाची शाळा भरली यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली.
तसेच कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.