"दोन सामाजाचे सण अनेकदा एकच दिवशी येवून मानव जातीला संदेश देतात की, चुकीच्या गोष्टी विसरुन सर्वांनी गुण्या गोविंदाने राहून जातिय सलोखा टिकून ठेवावे.याचातून बोध घेवून शहरातील मुस्लीम समाज बांधवांनी हिंदु बांधवांच्या आषाढी एकादशी या सणाच्या धार्मीक भावनेचा आदर करून यंदा बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारची कुर्बानी न करण्याचा निर्णय घेवून राष्ट्रीय एकात्मता वाढीस समाजात एक जन संदेश देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे."
--------------------------------------------------------
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दि.२९ जून २०२३ रोजी पवित्र बकरी ईदचा उत्साह होता.तरी पाऊस सुरू असल्याने शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी पिंपरुड रोड वरील ईदगाह ऐैवजी गावातील असलेल्या मस्जिदीत सकाळी ८-३० वाजता सामूहिकपणे ईदची नमाज पठण केली.यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सावदा पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक जालिंदर पळे,पीएसआय अन्वर तडवी,महेमुद शाह,उमेश पाटील,यशवंत टहाकळे,देवेंद्र पाटील सह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवानांनी शहरात चोखबंदोब ठेवला होता.