नाशिक जिल्ह्यातील अभिजीत सांबरे यांचा कोपरगाव तालुक्यात आढळला मृतदेह

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



अभी सांबरे यांच्या मृत्यूचे कारण हे आता पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होईल

नांदगाव - प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारातील नागपूर मुंबई महामार्गाच्या कडेला नाशिक जिल्ह्यातील सिडको उत्तम नगर येथील इसम अभिजीत राजेंद्र साबळे यांचा मृतदेह आढळून आल्याने हा घातपात आहे की अन्य काही यावरून एकच खळबळ उडाली असून नासिक सिडको उत्तम नगर येथील सांबरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ‌

            सदर इसम हा तुला जवळ माहित अवस्थेत पडलेला होता याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आहे. सदर व्यक्तीच्या अंगावरील कपड्यात आधार कार्ड व ड्राइविंग लायसन्स मिळून आले असून त्यावरून त्याची ओळख पटली असून त्याचे नाव अभिजीत राजेंद्र सांबरे राहणार सिडको उत्तम नगर नाशिक असे आहे.

     सदर बुद्धदेव अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शिवछेदन करण्यासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ‌ सदर व्यक्तीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असला तरी त्याच्या मृत्यूचे कारण पोलिसांच्या तपासाअंती समोर येणार आहे. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गवसने करत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!