सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावामध्ये अक्षय भालेराव नावाच्या तरुणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली या कारणाने बोंढार या गावातील काही जातीयवादी मानसिकतेच्या गावगुंडांनी तीक्ष्ण हत्याराने क्रूरपणे त्याचा खून करून जीवे ठार करण्यात आले आहे. हि घटना अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात आंबेडकरी तरुणाला जीवे ठार मारणाऱ्या गावगुंडांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. [ads id="ads2"]
यामधील अजून काही आरोपी फरार आहेत त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. आरोपींवर अँट्रासीटी कायद्याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करावा व कठोरात कठोर कार्यवाही करणेत यावी व मयत अक्षय भालेराव यांच्या परिवाराला पोलीस बंदोबस्त देऊन त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा.अश्या आशयाचे निवेदन सामाजिक समता मंच, रावेर तालुका यांच्या वतीने रावेर चे तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या
यावेळी सामजिक समता मंच चे राजू भागवत सवर्णै,उमेश रमेश गाढे,युवराज देवराम गाढे,विनोद रघुनाथ मोरे,सचिन विजय मोरे,चेतन रविंद्र भालेराव,प्रशांत दिलीप गाढे, महेंद्र मधुकर कोचुरे, विलास शामराव अवसरमल,महेंद्र गोपाल वानखेडे, ईश्वर भागवत अट काळे,प्रवीण पंडीत कोजगे,राहुल लालचंद लहासे, ईश्वर वामन जाधव,अरविंद रविंद्र महाजन, नितिन बाळू कोंघे,दिपक दयाराम लहासे,सचिन सुरेश महाले, शाहरूक खाटीक संतोष मधुकर लहासे यांच्या सह आदी जण उपस्थित होते.