रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा मक्ता आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धुळे या संस्थेला नगर परिषदेने कामात अनियमित व मार्गदर्शक सुचनांच्या नियमांची पायमल्ली केली , याबाबत नोटीस बजावली असतांना देखील कोणती ही सुधारणा न करता नगर परिषदेच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे.[ads id="ads1"]
रावेर नगरपरिषदेने घनकचरा मुक्तीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी कचरा निर्मितीच्या जागेवरच विगीकरण करणे व त्यावर शत्रोक्त प्रक्रिया करणे आवश्यक आहे . परंतु आस्था स्वयंम रोजगार सेवा सहकारी संस्था धुळे यांच्या कडून १००% घर ते घर कचरा संकलन होत नाही , प्रत्येक घंटा गाडीवर शेरे बुक ' घनकचरा प्रकल्प वरती प्रक्रिया नोंद वही नाही , घनकचरा प्रकल्प मध्ये ओल्या कचऱ्याचे वेळ कमी आहे , सुका कचरा प्रक्रिया केंद्र येथे सुका कचऱ्याचे वर्गीकरण घटक कमी आहे , घंटा गाडीवर माहिती दर्शक नावे स्पष्ट नाही , घंटा गाडीवर GPS सिस्टिम कार्यान्वित नाही , सर्व घंटागाडया नियमितपणे कचरा संकलनासाठी फिरत नाही असे नगरपरिषदेने घनकचरा ठेकेराला बजावलेल्या नोटीसीत ३ दिवसात लेखी खुलासा करावा अन्यथा आपला कार्यादेश रद्द करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे नोटीसीत म्हटले आहे , तरी देखील नगर परिषदेच्या नोटिसीला उत्तर दिलेले नाही असे अधिकृत सुत्रान्वये समजते.[ads id="ads2"]
तरी नगर परिषद या आस्था स्वयं रोजगार सेवा संस्थेवर मेहरबान का आहे ? या संस्थेवर नगर परिषद कोणती कारवाई करते याकडे सर्वांच लक्ष लागले आहे .
रावेर नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापनाचा मक्ता आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धुळे या एजन्सीला दिलेला आहे . गेल्या डिसेंबर २०२२ पासून आस्था स्वयंरोजगार एजन्सी काम करीत आहे . आता पर्यंत नगर परिषदनेने ३ वेळा नोटीस देवुन देखील कामात कोणती ही सुधारणा झालेली नाही . उलट जास्त तक्रारी येत आहे , त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे युवराज गोयल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.




