फैजपूर येथील आदिवासी हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर तालुक्यातील खेड्या - पाड्यात जनजागृती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



दिवासी हक्क परिषद यशस्वी  करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण रावेर तालुका  पदाधिकारी प्रचार आणि प्रसारासाठी ताड्या, वाड्यावर फिरत आहे. आणि जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहे.

रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा)  रावेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने येत्या 9 .जून रोजी फैजपूर येथे आदिवासी हक्क परिषद होत असून आदिवासी समुदायाला जागृत करण्यासह त्यांच्या  हक्काची जाणीव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर हे शुक्रवारी दिनांक 9 जून रोजी दुपारी 4 वाजता फैजपूर येथे येणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी हक्क परिषद होत आहे. [ads id="ads1"]

  त्याची जोरदार तयारी सुरू असून रावेर येथे आदिवासी तांड्या, वाड्यावर तामसवाडी रोड गिट्टी खदान या ठिकाणी  सायंकाळी 6 . वाजता आदिवासींना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे तालुका उपाध्यक्ष सलीम शहा , रतन भालेराव ,अजय तायडे ,कंदर सिंग बारेला, यांनी मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]

यावेळी कालू बारेला, सुभाराम बारेला, हमीर बारेला ,शिवलाल बारेला, विजय बारेला ,सोहन बारेला, प्रवीण बारेला, आशा बारेला, अनिता बारेला ,सावरी बारेला ,ताराबाई बारेला, सयानीबाई बारेला, सीताबाई बारेला बहुसंख्य महिला व पुरुष या ठिकाणी उपस्थित होते.

• हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा

• हेही वाचा : रावेर तालुक्यातील "या" ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतूसांसह गुन्हेगाराला बेड्या

• हेही वाचा:  रावेर शहरामध्ये एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!