जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अचानक भेट देवून रावेर शहरातील दोन धान्य गोडावून केली सील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरात  जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल (Jalgaon Collector Aman Mittal) यांनी दिनांक 31 मे 2023 रोज बुधवारी दुपारी ३ धान्य गोदाम वर धडक कारवाई केली होती.यातील सील करण्यात आलेल्या गोदाम मालकाला महसूल विभागातर्फे नोटीस जारी करण्यात येणार असल्याची माहिती रावेर चे तहसीलदार (Raver Tahsildar) बंडू कापसे यांनी दिली आहे.[ads id="ads1"] 

रावेर येथील बऱ्हाणपूर रोडवरील (Burhanpur Road,Raver)  चौधरी ट्रेडर्स या धान्यांच्या गोदामावर बुधवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल (Jalgaon Collector Aman Mittal) यांनी धाड टाकून २०८ गोण्या तांदूळ, ९७ गोण्या गव्हू, ११ गोण्या ज्वारी,१८० गोण्या मका असा साठा संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.[ads id="ads2"] 

   तसेच बालाजी टोल नाक्याजवळील  शेख नईम यांच्या गोदामात ८ गोण्या गव्हू, १७ गोण्या तांदूळ आढळून आला होता. तर रावेर येथील जि.एस.कॉलनीतील (GIS Colony,Raver)  गोदामात खाली बारदान मिळून आल्याने. हे तिन्ही गोदाम सील करण्यात आली आहे.

हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

गोदामे सील करून त्यासबंधी कारवाई करण्यासाठी पंचनामे करून यातील गोदाम मालकांना महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती रावेर चे तहसीलदार (Raver Tahsildar) बंडू कापसे यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!