सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेजचा १० वीचा निकाल १०० टक्के

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे




सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

 सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा येथे असलेल्या डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा यंदा १० विचा  निकाल १०० टक्के लागला आहे.  [ads id="ads1"] 

  मार्च २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार दुपारी १वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला असून त्यानुसार डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेज सावदाचे जाहीर झालेल्या निकालात शेख फरहत जहॉं यांनी (८७.८० टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला.[ads id="ads2"] 

   तर अलमीरा फातेमा यांनी(८३.२० टक्के)गुण  मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविले व जैनब नाज या विद्यार्थिनी (८०.८० टक्के)गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.या शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेज सावदाचे अध्यक्ष डॉ.हाजी हारून सेठ,प्रिन्सिपल शादाब अहमद सर,प्रिन्सिपल लक्ष्मी मॅडम,हाजी हारून सेठ फाउंडेशनचे अध्यक्ष नाजिम शेख सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!