सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- शासनातर्फे माझी वसुंधरा अभियान ३० राबवण्यात आले होते.त्यात राज्यातील १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या गटात रावेर तालुक्यातील सावदा न.पा.सह राज्यातील एकूण ९४ पालिकांनी सहभाग नोंदवला आहे.तरी या अभियानाच्या मूल्यमापनात सावदा पालिकेला ४४५६ गुण मिळाले.त्याच्या आधारे सदरील पालिकेने राज्यात सातवा आणि नाशिक विभागात चौथा क्रमांक मिळवला.[ads id="ads1"]
या यशाबद्दल माजी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाचे कौतुक केले.तर मुख्याधिकारी किशोर चव्हाण व आरोग्य अधिकारी सचिन चोळके,अरूणा चौधरी यांनी सावदा शहरातील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे अभियानात चांगली कामगिरी करता आली.तसेच भविष्यात या अभियानात अधिक उत्तम कामगिरी करू असे सांगितले.[ads id="ads2"]
वृक्ष लागवडीने साजरा केला पर्यवरणदिन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावदा शहरातील न.पा.संचालित मराठी शाळेतच्या आवारात प्रशासनाच्या वतीने वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.
हेही वाचा: अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना 401 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर : जिल्हानिहाय यादी पहा
हेही वाचा: रावेर तालुक्यातील "या" गावातील महिला बेपत्ता : निंभोरा पोलिसात हरवल्याची नोंद
याप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण,साहित्यिक प्रा.व.पू होले, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके,अंतर्गत लेखा परीक्षक भारती पाटील,लिपिक हमीद तडवी,प्रा.अनिल नेमाडे,वृक्षप्रेमी किरण गुरव,बुद्धभूषण बगाडे, अरुणा चौधरी,आकाश तायडे व इतर उपस्थित होते.