सावद्यातील बस स्थानकासमोरील इमारतमध्ये शॉपिंग सेंटर बनले विमल गुटख्याचे केंद्रबिंदू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  सलीम पिंजारी  फैजपूर तालुका यावल प्रतिनिधी

 फैजपूर येथून जवळच असलेल्या सावदा तालुका रावेर येथे मध्यप्रदेशातून बऱ्हाणपूर मार्गे दररोज लाखो रुपयाचा विमल गुटख्याची वाहतूक होत असल्याने सावद्यातील बस स्थानका समोरील इमारत मध्ये शॉपिंग सेंटर बनले गुटक्याचे केंद्रबिंदू कारवाई होणे गरजेचे.[ads id="ads1"] 

   याबाबत वृत्त असे की सावद्यातील बस स्थानकासमोरील इमारत मध्ये शॉपिंग सेंटर असून या शॉपिंग सेंटर मध्ये दररोज मध्यपरदेशातून विमल गुटका सहज उपलब्ध होत असून काही संबंधित अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध असल्यामुळे बिनधास्तपणे रावेर यावल मुक्ताईनगर तालुक्यात या ठिकाणातून दररोज अवैध विमल गुटक्याची वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना यामुळे कर्करोगाची लागण होण्याची सुद्धा  भीती व्यक्त होत असून पैशाच्या लोभा पोटी हा विमल गुटखा किंग  नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे.[ads id="ads2"] 

  या शॉपिंग सेंटर मध्ये परिसरातील किराणा दुकानाच्या नावावर विमल गुटखा घेणाऱ्यां  नागरिकांची सकाळपासून गर्दी सुरू असते की अक्षरशा येथे गजबजलेल्या ठिकाणी वाहतुकीची सुद्धा कोंडी होते त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक जिल्हाभरात कारवाई करत असताना या ठिकाणी कारवाई का होत नाही त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या ठिकाणी ठोस कारवाईची गरज असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!