डंपरने केले डिव्हायडरचे नुकसान,जिवितहानी टळली : शासनाचे आर्थिक नुकसान परंतु कारवाई शून्य

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


आमदारांना अपघाताचा अनुभव आणि अधिकारी निष्क्रिय

यावल  (सुरेश पाटील)

आज गुरुवार दि.1जून 2023 रोजी सकाळी बऱ्हाणपूर अंकलेश्वर तथा चोपडा रोडवर यावल येथे एसआरपेट्रोल पंपा समोर, उर्दू हायस्कूल जवळ आणि बस स्टॉप जवळ सुसाट, भरधाव वेगाने जाणारे बारा चाकी डंपर डिव्हायडरच्या उंच भिंतीवर चढून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले या अपघातात मात्र सकाळची वेळ असल्याने जीवित हानी झाली नाही स्थानिक लाकूड व्यवसाय धारकांनी त्या डंपर चालकास जेसीपी मशीनरीचे सहकार्य करून डिव्हाइडर वरून ट्रक काढून दिला आणि ट्रक त्या ठिकाणाहून फरार झाला हे विशेष.[ads id="ads1"] 

      सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर मुळे अपघात कसे होत आहेत याचा अनुभव संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील जनतेसह सर्व स्तरातील अधिकाऱ्यांना आणि चोपडा विधानसभेचे आमदार सोनवणे या  पती-पत्नींना असल्यावर सुद्धा लोकप्रतिनिधींचा प्रभाव आणि वचक संबंधित वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्यावर नसल्याने आणि अधिकारी वर्ग निष्क्रिय झालेला असल्याने अशा अप्रिय घटना संपूर्ण जळगाव जिल्ह्यात घडत आहेत पर्यायी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सर्व स्तरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"] 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर यावल  नगरपरिषद हद्दीत आणि यावल नगरपालिका कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एसआर पेट्रोल पंप सुरू झाला त्यावेळेस वाहनधारकांना दोघे बाजूने पेट्रोल पंपात प्रवेश करण्यासाठी महामार्गावरील बांधलेले डिव्हायडर यावल नगरपालिकेने बांधलेले डीव्हायडर तोडण्याची 'बे' कायदा परवानगी पेट्रोल पंप मालकास यावल नगरपालिका सदस्यांनी दिली होती आणि आहे.या ठिकाणी वीस पंचवीस मीटर लांबीचे डिव्हायडर अनधिकृत पणे तोडण्यात आल्याने यावल कडून चोपडा गावाकडे जाताना त्या ठिकाणी एसटी बस थांबा तसेच उर्दू हायस्कूल आणि प्रचंड रहदारी असल्याने वाहनधारकांना वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन किरकोळ अपघात घडत असतात.

 हेही वाचा : 5 महिन्याच्या चिमुकल्यासह महिलेने विहीरीत उडी घेऊन संपवली जीवन यात्रा ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

  अशाच प्रकारे आज गुरुवार दिनांक एक जून 2023 रोजी सकाळी पेट्रोल पंप जवळ तोडलेल्या डिव्हायडरच्या ठिकाणी कोणीतरी विरुद्ध दिशेने रस्त्यावर आल्याने सुसाट वेगाने धावणारे बारा चाकी डंपर सरळ रेषेत डिव्हायडर चढले डिवाइडरचे पर्याय शासकीय मालमत्तेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे डंपर चालकाने समय सुचकता बाळगून आणि पुढील कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून त्या ठिकाणच्या एका लाकूड व्यवसायिकाकडून जेसीपी घेऊन डिव्हायडरवर चढलेले डंपर काढून पलायन केले.

       या ठिकाणी भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आणि अपघातात जीवित हानी होऊन अप्रिय घटना घडणार नाही यासाठी यावल नगरपालिकेने तोडलेले डिव्हायडर पुन्हा बांधकाम करावे.तसेच शासकीय नुकसान झाल्याने संबंधित डंपर चालकाकडून वसूल करणेबाबत ठराविक ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून यावल पोलिसांनी डंपरचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!