मोहन सोनार दिव्यांग असूनही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट प्रामाणिक कामाचे कौतुक करण्यात आले व सेवा करीत असताना दिव्यांगांचे पुनर्वसनासाठी केलेल्या कामाची प्रशंसा करण्यात आली,शहरातील राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांची यावेळी भाषणे होऊन मोहन सोनार यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थितांमधे माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे माजी नगरसेवक भगतसिंग पाटील,इकबाल खा नशिर खा,डॉ.कुंदन फेगडे,माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, अभिमन्यू चौधरी,तुकाराम बारी,बाळासाहेब फेगडे तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कावडीवाले,शरद कोळी,पप्पू जोशी,संतोष खर्चे,हिंगोणा माजी सरपंच विजयसिंह पाटील,शशिकांत राणे,सागर देवांग,हुसेन तडवी,तसेच सागर लोहार, अशपाक शाह,मुख्याध्यापक अतुल गर्गे,नंदू बारी,सुनील देशमुख,चंदन देशमुख, पुंडलिक बारीदिलीप वाणी, राजेश वाणी,सारंग बेहेडे, गोपलसिंग पाटील,सिकंदर पटेल,असलम मोमीन,राहुल सावखेडकर,जनार्दन फेगडे, सदू भिल,फैजन शाह, सिकंदर तडवी,आण्णा भील, वकील अशोक सुरळकर, गोविंदा बारी,गौरव पाटील, निलेश मोरे,धीरज चौधरी, देवकांत पाटील,किशोर माळी,अलीम शेख,अरुण लोखंडे,अरुण गजरे,सागर गजरे,चेतन अढळकर,राजेश कडू महाजन, डॉ.बी.के.बारी,डॉ.रिजवान खान,डॉ.चंदन पाटील, डॉ.युवराज चौधरी,डॉ.निलेश गडे,पत्रकार मित्र,सर,पुंजो शेठ पाटील,सुवर्णकार बांधव,प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार राजमाल वाघ पारोळा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, चाळीसगाव अध्यक्ष, नीलकंठ साबणे,महिला आघाडी अध्यक्षा मनीषा पाटील,पाचोरा अध्यक्ष महेश गौड,किशोर नेवे जळगाव, शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव न.प.कर्मचारी जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, साचिन झालटे,योगेश कोळी, राकेश भंगाळे,माजी नगरसेवक विजयकुमार गजरे,प्राचार्य जी.एम.खान, प्रदीप पाटील तसेच यावल शहरातील पत्रकार बांधव यांनी अनेकांनी उपस्थिती दिली.[ads id="ads2"]
दिव्यांग क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन जळगाव जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेने सन्मानपत्र बहाल केले तर समाजबांधव म्हणून सुवर्णकार समाजाने गौरव केला व विविध प्रतिमा बहाल केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कर्ते एस.के.बाऊस्कर सर,तर आभार प्रदर्शन बऱ्हाणपूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य दिलीप मोरे यांनी केले.
मोहन सोनार यांची कर्तव्यदक्ष दिव्यांग कामगीरी
दिव्यांग असूनही सामाजिक आणि शासकीय कामात सक्रिय सहभाग घेऊन काम करणारे मोहन सोनार यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श दिव्यांग कर्मचारी पुरस्कार व गौरव प्रतिष्ठान पुणे यांचा समाजरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला,निवडणूक काळात आपले अपंगत्व विसरून वेळेवर व बिनचूक कामे केले याबाबत तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सन्मान केला,संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणू काळात निर्भिडपणे सेवा करून आपले कर्तव्य बजावले स्वतःचे जीवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता नियमित आणि पूर्ण वेळ कार्यालयात बसून निस्वार्थी सेवेबद्दल तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सन्मानपत्र दिले,तसेच सन १९९६-९७ यावर्षी पल्स पोलिओ या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन दिव्यांगांच्या रॅली काढून जनतेला आवाहन केले त्याच प्रमाणे न.पा.मालमत्ता कर नियमित भरून नगरपरीषदेस सहकार्य करा असे विनम्र आवाहन शहरातील जनतेला केले त्याचप्रमाणे जन्म- मृत्यू नोंदणी बाबतची नियमावली व डेंग्यू बाबतची घ्यावयाची काळजी याचे आवाहन जनहितार्थ प्रकाशित केली. त्यामुळे त्यांचे यावल नगर परिषदेतर्फे कौतुक करण्यात आले.



