बकरा ईद व आषाढी एकादशीच्या पश्वभूमीवर साकळी शांतता कमेटीची बैठक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल तालुका प्रतिनिधी:- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील साकळी येथे दिनांक :- 26/06/2023 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतिच्या सभागृहामध्ये येण्याऱ्या 29/06/2023 रोजी बकरा ईद व आषाढी एकादशी निमित्त शांतता कमेटी ची सभा चे आयोजन यावल पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आली.

साकळी येथे शांतता बैठकीत पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सर्व गावकरी यांना शांतता पूर्ण व एकोप्याने आपले आपले सण उत्सव साजरे करण्याचे व कोणत्याही धर्माचा अपमान होईल असे कृत करू नये, तरुण वर्गाने शिक्षणाकडे लक्ष केंद्रीय करून चांगला नागरिक घडावा, सोशल मीडियावर कोणाच्या धार्मिक भावना दुखतील असे फोटो वायरल करू नये. असे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणेस्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन व मदत करू असे आवाहन त्यांनी केले तर डॉ सुनिल पाटील यांनी शांतता बैठकीत थोडक्यात आपले एकात्मतेवर आधारित ना हिंदू भुरा है ना मुस्लिम बुरा है जिनके दिमाग मे शैतान भरा है ओ बुरा है असे म्हणत मनोगत व्यक्त केले. तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अशाफक सैय्यद शौकात यांनी सुद्धा आपले मनोगत चांगल्या पद्धतीने ऐकतेचे प्रतिक साकळी गावात कायम असल्याचे सांगितले यावेळी माजी ग्रामपंचायत सद्य खतीब तडवी,नसीर खान,सैय्यद अजहर,नूर कुरेशी, लतीब तडवी, राजु पिंजारी, पोलिस हवालदार मुजफ्फर तडवी, पोलिस शिपाई अल्लाउद्दीन तडवी, पोलिस मित्र नाना भालेराव, यांच्या सह साकळी येथिल तरुण वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!