अवैध गौण खनिज वाहतूक दाराकडून साकळी मंडळ अधिकाऱ्यास मारहाण व जीवे ठार मारण्याची धमकी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


आरोपीवर कड़क कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन ; महसूल संघटनेचा इशारा ; सर्कल,तलाठी यांच्यात तीव्र संताप

यावल (सुरेश पाटील)

यावल तहसील कार्यालयातील महसूल पथकाने आज सोमवार  दि. 26 जून 2023 दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास गौण खनिज वाहतुकीचा परवाना आहे का? अशी विचारणा केली असता त्यांने त्याच्या मालकाला कळविले व मालकाने त्या ठिकाणी येऊन दादागिरीने तहसीलच्या वाहनावर जोरजोरात लाकडी दांडुक्याने आदळ,आपट करून तसेच दगडफेक केली व साकळी मंडळाधिकारी जगताप यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मोबाईल मध्ये केलेला व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट कर असे म्हणत सर्कल यांचा मोबाईल हिसकावून घेतला व मोबाईल झाडा झुडपात फेकून दिला आणि जगताप यांना बेदम मारहाण केल्याची घटना आज यावल तालुक्यात पश्चिम भागात घडली.[ads id="ads1"]

         घडलेली घटना नियुक्त महसूल पथकाने तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांना सांगितली व त्यांनी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील कार्यवाही केली. यावल पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई न केल्यास यावल तालुका मंडळ अधिकारी व तलाठी संघटना काम बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले,यावल पोलिसांचा वचक मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर न राहिल्याने तसेच मारहाण प्रकरणात साधी चौकशी किंवा जाबजबाब सुद्धा घेतले जात नसल्याने यावल पोलिसांच्या कर्तव्याबाबत  अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"]

   यावल तहसील एक भरारी पथक डांभुर्णी परिसरात साकळी मंडळ अधिकारी,डांभुर्णी तलाठी, कोळन्हावी येथील कोतवाल  हे पथक अवैध गौण खनिज वाहनांची तपासणी करीत  असताना डांभुर्णी कडून डांभुर्णी कोळन्हावी रोडवर तापीनदीकडे जाणाऱ्या नाल्यात स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र. एमएच-19 -सीवाय- 0578 आणि निळ्या रंगाची ट्रॉली थांबवून त्यावरील चालक आकाश अशोक कोळी रा.डांभुर्णी यांचे कडे ट्रॅक्टर मध्ये असलेल्या वाळू बाबत परवाना आहे किंवा काय कसे? अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नव्हता सदर ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर कोणाच्या मालकीच्या हे विचारले असता सुपडू रमेश साळुंखे राहणार कोळन्हावी असे सांगितले सदर ट्रॅक्टर मालक यांनी ट्रॅक्टर हायड्रोलिक करून रिकामी केले व माझा यापूर्वी सुद्धा ट्रॅक्टरचा दंड झालेला असल्याने मी ट्रॅक्टर तुमच्या ताब्यात देणार नाही यावल तहसीलला लावणार नाही असे म्हणत हूज्जत बाजी करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली सदरचे ट्रॅक्टर पळवून नेत असताना साकळी मंडळ अधिकारी जगताप यांचे वाहन नाल्यात फसल्याने अतिरिक्त मदत म्हणून तहसील कार्यालय यावल यांचे वाहन घेण्यात आले मदतीसाठी दूरध्वनीवरून चुंचाळे येथील तलाठी व कोतवाल यांना मंडळ अधिकारी साकळी जगताप यांनी बोलावून घेतले तहसीलच्या गाडीच्या मदतीने ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रल्हाद सोळंके यांच्या मदतीने सदर ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी यावल तहसील कार्यालय येथे जमा करणे करता निघाले जगताप यांची गाडी नादुरुस्त झाल्याने ते किनगाव येथे थांबले पुढील कारवाईसाठी तलाठी कोळन्हावी,तलाठी चुंचाळे,कोळन्हावी कोतवाल घटनास्थळी आले त्यानंतर सदर ट्रॅक्टर हे यावल येथे नेत असताना नावरे फाट्याजवळ अकलूज येथील तलाठी हे पथकात सामील झाले तसेच नावरे फाट्याजवळ मालकाने ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालक आकाश अशोक कोळी याला बळजबरीने खाली उतरवले व त्याच्या जागी गोपाळ प्रल्हाद साळुंखे याला ट्रॅक्टर चालवण्यात दिले त्यानंतर ट्रॅक्टर चालक गोपाळ साळुंखे यांनी सदर ट्रॅक्टर नावरे फाट्याकडून शिरसाळ कडे पळविले हे करीत असताना सुपडू रमेश साळुंखे यांनी तहसीलच्या वाहनावर जोरजोरात लाकडी दांड्याने आदळ आपट केली व वाहनावर दगडफेक केली सदर घटना घडली त्यावेळी तलाठी कोळन्हावी  यांनी दूरध्वनी द्वारे साकळी मंडळाधिकारी जगताप यांना कळवली तेव्हा जगताप यांनी तात्काळ साकळी तलाठी व कोतवाल यांना घटनास्थळाकडे रवाना होण्यास सांगून स्वतः तलाठी आडगाव यांच्या समवेत घटनास्थळाकडे आले मंडळ अधिकारी साकळी व तलाठी आडगाव साकळी गावात आले असता त्या ठिकाणी असलेल्या ट्रॅक्टर मालक सुपडू याने जगताप यांना रस्त्यात अडवून आरडा ओरड व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली दगड उचलून सदरचे दगड अंगावर मारून फेकले त्या ठिकाणी पनवेल येथील कोतवाल व सोबत असलेल्या तलाठी आडगाव यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जोरात ढकलून दिले मी तुला जिवंत सोडणार नाही तू माझे ट्रॅक्टर कसे पकडले अशी धमकी देत चापटा बुक्क्यांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच साकळी मंडळ अधिकारी जगताप यांना प्रथम गटारीत लोटून दिले व नंतर काट्यात ढकलुन फेकून दिले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच तुझा मोबाईल मधली व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट कर असे म्हणत मोबाईल हिसकावून घेतला व मोबाईल झाडाझुडपात फेकून दिला त्यानंतर हातात मोठ-मोठे दगडे घेऊन तो मंडळ अधिकारी यांचे अंगावर धावून येत मोटार सायकल घेऊन फरार झाला

सदर घटनेबाबत संपूर्ण स्टॉप व पथक संध्याकाळी तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे घड़लेली घटना सांगितली सदर घटनेबाबत तात्काळ तहसीलदार यांनी यावल पोलीस स्टेशन गाठले याबाबत त्वरित गुन्हा दाखल करा असे ठाण मांडून पूर्ण पथक पोलीस स्टेशनला बसलेले होते यावल पोस्टेला गुन्हा दाखल करा व सदर आरोपी त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा उद्यापासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असे महसूल सर्कल,तलाठी संघटनेकडून मागणी करण्यात आली.सदर घटनेबाबत आपण उद्या मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, सदर प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून सहकार्य मिळणे गरजेचे असून महसूल गौण खनिज पथकाला, पोलिसांकडून संरक्षण मिळत नाही पर्यायी महसूल कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो याबाबत महसूल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

        महसूल गौण खनिज पथकावर अवैध गौण खनिज वाहतूकदारांने जो हल्ला केल्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर व गुन्हेगारांवर यावल पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे आणि गुन्हेगारांवर वचक का राहिलेला नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!