------------------------------------------------------------
"सदरील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी याबाबत सावदा शहरातील आंबेडकरी महिला व पुरुषांनी सामूहिकरीत्या सावदा पोलिस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------------------------------------[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे २५/६/२०२३ रोजी सायंकाळी ७-१२ वाजेच्या सुमारास शहरातील दिपक राज पाटील समर्थ अकॅडमीचे शिक्षक यांनी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून इंस्टाग्राम ॲपवर आक्षेपार्य लिखाण प्रसारित केल्याने याबाबत फिर्यादी व त्याचे दोन साथीदारांनी आक्षेपार्य पोस्ट का शेअर केली,अशी विचारणा केली असता[ads id="ads2"] माझे काय वाकडे करायचे ते करून घ्या? असे धमकी देऊन जातिवाचक बोलून फिर्यादी व त्याचे धर्मांचे भावना दुखावले यावरून,याबाबत श्रीकांत उर्फ नाना पुंडलिक संन्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपक राज पाटील यांच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुरनं.१४३/२०२३ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारणा कायदा १०१५ चे कलम ३(१)(आर)(५), व भादवीचे कलम ५०६ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला त्याला अटक देखील करण्यात आले आहे. पुढील तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाले हे करीत आहे,सदर घटनेच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, कुणाल सोनवणे,सह फैजपूर पो.स्टचे एपीआय निलेश वाघ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.