यावल प्रतिनिधी (मिलिंद जंजाळे )
यावल ते चोपडा पर्यंत पूर्ण पणे बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्याचे पूर्ण पणे बारा वाजलेले असुन या रस्ताने नेहमी प्रवासी व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात राहदारी असतांना मात्र या कडे खासदार ताई यांचे दुर्लक्षच दिसुन येत आहे.
बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा रस्ता न्यॅशनल हायवे म्हणुन त्यांची गणना केले जाते परंतु सदर रस्त्याचे मोठ्या प्रमाणात बारा वाजलेले आहेत त्यामुळे राहदारी करण्यास मोठ्या प्रमाणात लोकांना जिव धोक्यात घालुन या रस्त्याने चालावे लागत असते रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे च खड्डे झालेले आहेत लोकांना रस्त्याने प्रवास करतांना केव्हा जिव गमवावा लागेल यांची शास्वती नाही. या रस्त्याच्या विकासासाठी 61 कोटी मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे परंतु रस्त्याचे ना उदघाटन ना रस्त्याच्या कामाला अजून सुरुवात झाली पाऊसाळ्यास सुरुवात झाली आहे आज जो रस्ता थोड्या काही प्रमाणात दिसत आहे पूर्ण पाऊसात रस्ता दिसेन कि नाही अशी अवस्था या जिव घेण्या रस्त्याची होणार हे निश्चित आहे कारण कारण रस्त्यात इतके खड्डे झाले आहेत कि रस्त्याने वाहन चालवणे म्हणजे जिव धोकात घालणे अशी परिस्थिती आहे.
बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता हा अगोदर राज्य शासनाच्या ताब्यात होता तेव्हा पण अशीच स्थिती होती परंतु काही वर्षांपूर्वी हा रस्ता केंद्र शासनाकडे वर्ग झाल्याने जैसी ठीक वैसी परिस्थिती पेक्षाही बिकट परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे रस्त्याने नेहमी ये -जा करणारे नागरिक रस्त्याच्या उदघाटनाची मोठ्या प्रमाणात वाट बघत आहेत त्याचप्रमाणे रस्ता नूतनीकरण करण्यास अजून किती वेळ लागणार आणि सुसज रस्त्याने नागरिकांना कधी सुखमय प्रवास करण्यास मिळेल आणि आपल्या विभागाच्या खासदार ताई साहेब किती लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावणार आहेत याकडे यावल चोपडा रस्त्याने प्रवास करणारे नागरिक प्रतीक्षेत आहेत. तरी खासदार ताई साहेब यांनी बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ताकडे लक्ष केंद्रित करून रस्त्याचे काम मार्गी लावावे व या रस्त्याने प्रवाशांना लवकरात लवकर सुखी प्रवास करता येईल. जीवित हानी होऊ न यासाठी प्रयत्नशील रहावे अशी मागणी केली जात आहे.


