विमल गुटख्याचे दाहा पैकेट घ्या आणि "सोना-चांदी" जिका:तस्करांची आयुष्य उद्ध्वस्त करणारी ऑफर!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- यावल तालुक्यात असलेल्या फैजपूर व परिसरात यंत्रणेच्या डोळ्यात डोळे घालून राज्य सरकारने बंदी घातलेल्या विमल सह विविध प्रकारचे गुटखे आणि तंबाखूजन्य पदार्थची  बिनधास्त तस्करी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आसल्या बाबत अनेकदा वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत,मात्र सदरील शहर व परिसर अशा जनतेच्या जीवितास धोका निर्माण करणारा बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असून होत नसल्याचे भासविले जाण्या मागे फक्त बंदा रुपया कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

याचे बोलके उदाहरण असे की,बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील इतर ठिकाणी वरिष्ठ यंत्रणेने कडून छापे टाकले जात असून,या अनुषंगाने स्थानिक यंत्रणा मात्र धूर्तराष्ट्राच्या भूमिकेत का?असे असताना फैजपूर व परिसरात गुटका तस्करी करणाऱ्या कडून दहा पैकेट घ्या आणि सोना-चांदी जिका अशी ऑफर देवून विषारी विमल गुटख्याची इको व्हॅनच्या मदतीने "एम" नामक व्यक्तीकडून बिनधास्त विक्री सुरू असल्याची चर्चा चर्चिला जात असून,हा तस्करीचा व्यवसाय कोणाच्या तरी आशीर्वादाने फुलत आहे? सदरील गुटखा हा महाराष्ट्र राज्यात मध्यप्रदेशातील शहापूर येथून येत असल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!