"गेल्या १० दिवसांपूर्वी सिमरण राजेश वानखेडे यांनी जळगाव येथील जैन हिल्स येथे आपला परिचय देत खा.शरद पवार यांची भेट घेतली होती,यादरम्यान सिमरण तू ज्या सावदा ऐतिहासिक नगरीतून आली.त्या नगरीचे आजच्या ५० वर्षापूर्वी विष्णू हरी पाटील हे नगर अध्यक्ष होते,त्यांच्याशी माझे पारिवारिक संबंध होते.असे त्यावेळी साहेबांनी सिमरण वानखेडे यांना सांगीतले होते."
----------------------------------------
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा सावदा नगरीचे शिल्पकार तसेच दानशूर व्यक्तिमत्व कै.बाळासाहेब रवींद्र विष्णू पाटील यांना वयाच्या ८७ व्या वर्षी आज दि.२९ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पुणे येथे निधन झाले.त्यांची अंतयात्रा दि. ३० जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता सावदा येथील पाटील पुरा,लहान मारुती जवळील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्यविधी अंत्ययात्रा निघाली,अतिशय शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
बाळासाहेब विष्णू हरी पाटील यांनी ११ वर्ष सावदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद भूषविले,या पदावर विराजमान असताना,त्यांनी शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय व विकास कामे त्यावेळी केली असून,यात विशेषकर सावदा पासून १२ कि.मी.असलेले मंगलवाडी गाव येथून तापीनदी वरील हतनूर धरणाच्या बॅकवॉटर मधून पाईपलाईन टाकून ४ कोटी रुपयेची कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करून मार्गी लावली होती.आज तगायत त्या योजनेचा शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा उपयोग होत आहे.
त्यांचे पश्चात सुपुत्र अमोल रवींद्र पाटील,पुतणे सतीश कुमार पाटील,मनोज कुमार पाटील, आणि ३ मुली असा परिवार आहे.


.jpg)