भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा जळगावात निषेध

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 
 : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेला भ्याड हल्याचा निषेध केला आहे.

 मोदी राजवटीच्या काळापासून वंचित समूहावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. वंचित बहुजन  जगणे या सत्ताधीशांनी अतिशय कठीण करून टाकले आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे चंद्रशेखर आझाद यांच्यावर काल रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांना जायबंदी केले.योगी सरकारने या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या घटनेने चंद्रशेखर आझाद घाबरतील आणि न्यायाची लढा सोडून देतील, असे संकुचित वृत्तीच्या आणि रोगट मनोवृत्तीच्या लोकांना ठेचल्याशिवाय आता तमाम बहुजन आणि भीम आर्मीचे लोक स्वस्थ बसणार नाहीत. अशा पद्धतीचा संताप मुकुंद सपकाळे, रमेश सोनवणे, महिंद्र केदार, चंदन बिराडे, दिलिप भाऊ सपकाळे,भारत सोनवणे, वाल्मीक सपकाळे, मनोहर लोखंडे, संजय सपकाळे, वाल्मीक  जाधव, दादाराव शिरसाठ, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, जगदिश सपकाळे, दत्तू सोनवणे,नारायण सोनवणे, युवराज सुरवाडे, भारत सासणे यांनी व्यक्त करून, निषेध व्यक्त केला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!