सावद्यातील ॲंग्लो उर्दू शाळेत होणारी शिक्षक भरती बाबत माध्य.शिक्षणाधिकरी जि.प.कडे हरकत दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा येथे असलेली इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी व याद्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल ही शाळा सन २०१९ पासून बोगस शिक्षक भरती व संचालकांमधील  वादविवाद थेट पोलिस स्टेशन ते न्यायालय सह जळगांव ते नाशिक  धर्मदाय विभागा पर्यंत गेलेले असून,ही शैक्षणिक संस्था व शाळा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भलतीच प्रकाशझोतात आलेली आहे.[ads id="ads1"]

या शैक्षणिक संस्थेचे संचालक मंडळाचे वाद व दावे संबंधित यंत्रणेनेकडे न्यायप्रविष्ट असतान यादरम्यान अल्पमतात असलेले २ ते ३ संचालक आणि मुख्याध्यापक कडून थेट कायद्याने विहीत केलेल्या पद्धतींचा वापर न करता फक्त वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून मनमानी पद्धतीने वेळोवेळी मालिका स्वरुपात शाळेत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवित आहे.[ads id="ads2"]

तसेच अश्याच प्रकारे या शाळेत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक शिक्षक भरती विरोधात इतर संचालकांसह पालकांनी हरकती घेतल्या मुळे नविन शिक्षकांना माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.जळगाव कडून अद्यापही मान्यता मिळालेली नसून,या शाळेत बी.ए.बी.एड.हिंदी-उर्दु या विषयाचे अनुदानित पदाचे शिक्षकांचा कार्यकाळ संपला असता त्याजागेवर थेट(विषय) बदलून बी.ए.बी.एड.इंग्रेजी व इतिहास या विषायाचा शिक्षक भरती करणे बाबची जाहिरात सदरील अल्पमतात असलेले संचालक व मुख्याध्यापक यांनी  दि.१४/६/२०२३ रोजीच्या एका दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली असून,त्यात दि.१८/६/२०२३ रोजी जाहिरातीत नमूद मजकूरा अन्वे येणाऱ्या पत्रतांचे इच्छूकांची मुलखत घेतली जाणार आहे.तरी नियमबाह्य भरतीस मंजूरी दिली जावू नये,म्हणून कही संचालकांनी व शेख फरीद शेख नुरोद्दीन या जागृत पालकांनी नुकतेच शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जि.प.जळगाव यांच्याकडे तिव्र स्वरुपाची हरकत दाखल केली आहे.तसेच घेण्यात आलेली हरकतमध्ये असे म्हटले आहे की,

सदरील पदवीचा शिक्षक भरणेसाठी वृत्तपत्रात जाहिरात देण्याकरिता संबंधितांनी शिक्षण विभागा कडून पुर्व परवानगी घेतली आहे का?तसेच हिंदी-उर्दू या विषयाचा शिक्षक न भरता सदर जागी इंग्रेजी व इतिहास या विषयाचा शिक्षक भरणे विद्यार्थ्यांच्या हिताचे व कायद्याला धरून आहे का?सदरील पद भरण्यासाठी या संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळाची मान्यता आहे का?यासह इतर आवश्यक बाबीची रितसर पुर्तता करूनच मान्यता मिळणेकामी सदरील पाठपुरावा केला आहे का?याबाबतची सखोलपणे चौकशी शिक्षणाधिकारी यांनी आपल्या स्तरावर तात्काळ करावी,असे मागणी हरकतदारांकडून करण्यात आली आहे.तसेच  मोठी रक्कम घेऊन सदरील विषयाचा शिक्षक घेतला जाणार असल्याची चर्चा देखील शहरात चर्चिला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!