फरार आरोपीस अटक होत नसल्याने महसूलचे काम बंद आंदोलन आणि सामूहिक रजेवर जाणार असल्याचा लेखी इशारा
यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यात मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यावर गेल्या २ दिवसापूर्वी तालुक्यातील वाळूमाफियाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने 'भ्याड' हल्ला केल्याने यावल पोलीस स्टेशनला 'त्या' वाळू माफिया विरुद्ध गुन्हा दाखल झाला परंतु गेल्या २ दिवसात आरोपीस अटक न झाल्याने यावल पोलिसांवर आर्थिक, सामाजिक,राजकीय दडपण आले आहे का ..? असा प्रश्न तालुक्यात उपस्थित केला जात असून तालुक्यातील मंडळ अधिकारी,तलाठी मानसिक दडपणाखाली आल्याने फरार आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत यावल तालुका तलाठी संघ काम बंद व सामूहिक रजा टाकून आंदोलन करणार असल्याचा लेखी इशारा त्यांनी आज फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग तसेच यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे दिला आहे.
लेखी निवेदनात यावल तालुका तलाठी संघ व मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
दि.२६ जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी साकळी भाग भरारी पथक डांभुर्णी परिसरात साकळी मंडळ अधिकारी,डांभुर्णी तलाठी, कोळन्हावी येथील कोतवाल हे अवैध गौण खनिज
वाहनांची तपासणी करीत असताना डांभुर्णी कडून डांभुर्णी - कोळन्हावी रोडवर तापीनदीकडे जाणाऱ्या नाल्यात स्वराज कंपनीचे
ट्रॅक्टर क्र.एमएच-१९ -सीवाय- ०५७८ आणि निळ्या रंगाची ट्रॉली थांबवून त्यावरील चालक आकाश अशोक कोळी रा.डांभुर्णी
यांचे कडे ट्रॅक्टर मध्ये असलेल्या वाळू बाबत परवाना आहे किंवा काय कसे? अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाही
परवाना नव्हता सदर ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर कोणाच्या मालकीच्या हे विचारले असता सुपडू रमेश साळुंखे राहणार कोळन्हावी
असे सांगितले सदर ट्रॅक्टर मालक यांनी ट्रॅक्टर हायड्रोलिक करून रिकामी केले व माझा यापूर्वी सुद्धा ट्रॅक्टरचा दंड झालेला
असल्याने मी ट्रॅक्टर तुमच्या ताब्यात देणार नाही यावल तहसीलला लावणार नाही असे म्हणत हूंज्जत बाजी करून शासकीय
कामकाजात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली सदरचे ट्रॅक्टर पळवून नेत असताना साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांचे वाहन नाल्यात फसल्याने अतिरिक्त मदत म्हणून तहसील कार्यालय यावल यांचे वाहन घेण्यात आले मदतीसाठी दूरध्वनीवरून
चुंचाळे येथील तलाठी व कोतवाल यांना मंडळ अधिकारी साकळी जगताप यांनी बोलावून घेतले तहसीलच्या गाडीच्या मदतीने
ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रल्हाद सोळंके यांच्या मदतीने सदर ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी यावल तहसील कार्यालय येथे जमा करणे करिता निघाले जगताप यांची गाडी नादुरुस्त झाल्याने ते किनगाव येथे थांबले पुढील कारवाईसाठी तलाठी कोळन्हावी,तलाठी चुंचाळे,कोळन्हावी कोतवाल हे यावलला निघाले.नावरे फाट्याजवळ ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालक आकाश अशोक कोळी याला बळजबरीने खाली उतरवले व त्याच्या जागी गोपाळ प्रल्हाद साळुंखे याला ट्रॅक्टर चालवण्यात दिले त्यानंतर ट्रॅक्टर चालक गोपाळ साळुंखे यांनी सदर ट्रॅक्टर नावरे फाट्याकडून शिरसाळ कडे पळविले हे करीत असताना सुपडू रमेश साळुंखे यांनी तहसीलच्या वाहनावर जोरजोरात लाकडी दांड्याने आदळ आपट केली व वाहनावर दगडफेक केली सदर घटना घडली त्यावेळी तलाठी कोळन्हावी यांनी दूरध्वनीद्वारे साकळी मंडळाधिकारी जगताप यांना कळवीले तेव्हा जगताप यांनी
तात्काळ साकळी तलाठी व कोतवाल यांना घटनास्थळाकडे रवाना होण्यास सांगून स्वतः तलाठी आडगाव यांच्या समवेत
घटनास्थळाकडे आले मंडळ अधिकारी साकळी व तलाठी आडगाव साकळी गावात आले असता त्या ठिकाणी असलेल्या ट्रॅक्टर
मालक सुपडू याने जगताप यांना रस्त्यात अडवून आरडा ओरड व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली दगड उचलून सदरचे दगड अंगावर मारून फेकले त्या ठिकाणी मनवेल येथील कोतवाल व सोबत असलेल्या तलाठी आडगाव यांनी त्याला रोखण्याचा
प्रयत्न केला असता त्यांनाही जोरात ढकलून दिले मी तुला जिवंत सोडणार नाही तू माझे ट्रॅक्टर कसे पकडले अशी धमकी देत चापटा बुक्क्यांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच साकळी मंडळ अधिकारी जगताप यांना प्रथम गटारीत लोटून दिले व
नंतर काट्यात ढकलुन फेकून दिले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच तुझ्या मोबाईल मधली व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट कर
असे म्हणत मोबाईल हिसकावून घेतला व मोबाईल झाडा-झुडपात फेकून दिला त्यानंतर हातात मोठ-मोठे दगडे घेऊन तो मंडळ
अधिकारी यांचे अंगावर धावून येत मोटार सायकल घेऊन फरार झाला.सदर घटनेचा यावल तलाठी संघ जाहीर निषेध करत
आहे.सदर वाहन मालक याच्या विरूध्द या अगोदर अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.तरी महोदय अशा मारहाणीच्या
घटनेमुळे महसुल कर्मचारी तलाठी व मंडळ अधिकारी हे मानसीक दडपणाखाली आले असुन सदर इसमावर गुन्हा दाखल केला परंतु आरोपीस जोपर्यंत अटक होत नाही तो पर्यंत यावल तालुका तलाठी संघ हे कामबंद व सामुहीक रजा आंदोलन करणार असुन
आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनावर यावल तालुका तलाठी संघ अध्यक्ष एस.व्ही.सूर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी आय.आर. कोळी,सचिव टी.सी.बारेला, उपाध्यक्ष समीर तडवी,मंडळ अधिकारी ए.एच.तडवी,पि.यू. वारूळकर,व्ही.आर.तडवी, एस.बी.गोसावी,एस.एस. पाटील,एस.जी.बापट,ए. एच.बडगुजर,एच. व्ही.वाघ,व्ही.बी.नागरे,एन. जे.धांडे,बी.एन.वानखेड़े,व्ही. बी.नागरे यांच्यासह इतर तलाठी,मंडळ अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.
----------------------------------------------
यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चिथावणीखोर आणि गुन्हेगारांना पोषक वातावरण
साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली आहे,अवैध गौण खनिज वाहतूकदारां विरुद्ध कारवाया थांबत नसल्याने कोणीतरी अवैध गौण खनिज वाहनधारकांना चिथावणी दिल्याने मंडळ अधिकारी जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ही घटना लक्षात घेता प्रांताधिकारी कैलास कडलग,आणि यावल तहसीलदार यांनी अवैध गौण खनिज वाहने पकडण्यासाठी ठराविक भागात बैठे पथक पोलीस बंदोबस्तात तैनात करून ठोस कारवाई करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.महसूल व पोलीस कार्यक्षेत्रात काही जबाबदार अधिकारी हे स्वतःहून आपले कर्तव्य न बजावता प्रसिद्धी माध्यम यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा त्यांनी बातमी लावली म्हणून आम्ही कारवाई करीत आहे असे गुन्हेगारांना सांगत असून गुन्हेगार संबंधितांना टार्गेट करून मारहाण शिवीगाळ करीत आहेत हा एक नवीन फंडा काही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावल तालुक्यात सुरू केला आहे त्यामुळे पुराव्यानिशी याचा भंडाफोड लवकरच वरिष्ठ स्तरावर समोर येणार असून संबंधिता विरुद्ध शासकीय विभागामार्फत कारवाई होणार आहे.


