रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
आज दिनांक 15 जुलै रोजी सरदार वल्लभाई पटेल ऐनपूर येथे, मुख्याध्यापक आदर्श शिक्षक SD चौधरी यांच्या उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली.
सर्वप्रथम सभांमध्ये उपस्थित असलेले सर्व पालक वर्ग यांचे शिक्षकवर्गांकडून उपस्थित राहिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.तसेच मुख्याध्यापक SD चौधरी पुढे म्हणाले की, इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनी यांना अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत मोफत पास सेवा मिळण्यासाठी जी अडचण निर्माण झाली होती. ते सोडवले असून ,त्यांना सुलभतेपणे पास उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.[ads id="ads1"]
तसेच विद्यार्थी वर्ग यांनी शाळेत येताना आणि जाताना बस मध्ये चढ उतर करत असताना अपघात होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच विद्यार्थी वय 3 वर्षापासून पुढे सर्वांसाठी विम्याचे महत्त्व सांगितले गेले . प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वर्षाला 33 रुपये भरणा केल्यास पुढील प्रकारे विमा लागू होतो विद्यार्थी यास नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख रुपये तसेच एक्सीडेंटले दुखापत झाल्यास मेडिक्लेम म्हणून मोफत इलाज केला जातो. अशाप्रकारे विम्याचे महत्त्व विद्यार्थी यांच्या पालकांना सांगण्यात आले .अशी काळजी प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
तसेच दरवर्षीप्रमाणे पालक संघ या कमिटीमध्ये अध्यक्ष व सचिव यांची नियुक्ती सरांना देण्यात आली. तर शिक्षक संघ उपाध्यक्ष म्हणून सदाशिव फकीरा सोनवणे यांची नियुक्ती आदर्श मुख्याध्यापक SD चौधरी यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन करण्यात आली.
तसेच पालक म्हणून विनोद हरी कोळी यांनी शिष्यवृत्ती संबंधि या विषयावर बोलले की इयत्ता पाचवी ते दहावी या मुलांचे पाच वर्षापासून शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स शिक्षक वर्गांकडून बोलवले जात आहेत, परंतु अद्याप कोणतेही विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती मिळत नाही बहुतेक विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून आजपर्यंत वंचित आहेत. असा सवाल ? केला असता त्याला सर्वस्वी जबाबदार शासन आहेत. असे मुख्याध्यापक SD चौधरी सर यांनी स्पष्ट नमूद केले.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या
सर पुढे बोलले की आम्ही प्रस्ताव जमा करतो पाठवितो पण त्याला शासन मंजुरी देतच नाही. त्यामुळे सर्वत्र पालक वर्गात खळबळ उडाली आहेत. त्यामुळे शिक्षक वर्गांनी शिष्यवृत्ती कडे त्वरित लक्ष घालावे अशी पालक वर्गाकडून अपेक्षा आहेत.
त्या ठिकाणी उपस्थित मुख्याध्यापक SD चौधरी सर सर्व शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



