ऐनपूर येथे ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे बारा तासांपासून विज पुरवठा बंद : उकाळ्यामुळे नागरिक हैराण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपुर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

ऐनपुर येथे  ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे बारा तासांपासून विज बंद होती हवेत आद्रतेचे प्रमाण 75% पेक्षा अधिक असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत .[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर वृत्त असे की ऐनपूर  येथील 33/11 के वी वीज उपकेंद्रावर आज सकाळी चार वाजता बिघाड झाला.  ट्रांसफार्मर खराब झाल्यामुळे आज दिवसभर लाईट बंद होती. संध्याकाळी चार वाजता वीज सुरू झाली सकाळपासून नागरिकांना उकाळ्यामुळे हैराण, तसेच हवेतील आद्रतेमुळे येथील नागरिक हैराण झाले सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसापासून वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा असूनही कमाल तापमान 37 ते 38 अंशावर आहे तर हवेतील आद्रतेचे प्रमाण 75% पर्यंत आहे जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत उकाळ्याचे प्रमाण कायम राहील असे या क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले आहे राज्यात सगळीकडे पाऊस सुरू असताना जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प दिसून येत आहे.[ads id="ads2"] 

  शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे जून महिना कोरडा गेला कमीत कमी जुलै महिन्यात दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे अजूनही काही भागांमध्ये पेरण्या झालेल्या नाहीत जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या सुद्धा खोडंबलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहे त्यांना आपली पिके वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे त्यातही विजेचा लपंडाव सारखा सुरू असतो शेतीसाठी फक्त रात्रीच वीज उपलब्ध असते ऐनपूर येथील वीज उपकेंद्रावर 9 ते 10 गाव असून , वीज चोरीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे वीज नेहमी गायब असते .जे नियमित वीज बिल भरतात त्यांना मात्र याचा तोटा सहन करावा लागत आहे. ऐनपुर येथे दररोज सकाळी सहा ते सात तास वीज बंद असते सध्या अघोषित लोडसेडिंग सुरू आहे लोड शेडिंग जरी बंद असले तरी ऐनपूरकरांना दररोज लोडशेडिंग चा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी रात्रीची आठ तासांची वीज देय असताना सुद्धा त्यातील दोन तास कमी करून फक्त सहा तास शेतीला वीज देत आहे अशी सुद्धा शेतकऱ्यांची ओरड आहे. याबाबत महा वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. ऐनपूर येथील वीज उपकेंद्रावर कनिष्ठ अभियंता नियमित हजर नसतात अशी गावकऱ्यांची ओरड आहे. आज दिवसभर वीज नसल्यामुळे गावातील पाण्याचे रोटेशन सुद्धा चुकलेले आहे त्यामुळे अनेक लोकांना आज पिण्याचे पाणी मिळाले नाही जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही तसेच गावाला नियमित व सुरळीत वीज, पुरवठा  मिळावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!