दिव्यांग, विधवा ,गोरगरीब आणि शेतकरी यांच्यासाठी सतत झटणारे माननीय "बच्चुभाऊ" यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले, की माझ्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, पोस्टर करण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांना वही पुस्तक वाटप झाली पाहिजे,तसेच वृक्ष लागवड झालीच पाहिजे. बच्चु भाऊ यांचे विचार लक्षात घेता, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे आज दिनांक 05/07/ 2023 या रोजी रावेर येथे "ग्रामीण रुग्णालय "आणि तहसील कार्यालय, येथे वृक्ष लागवड करण्यात आली.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी जिल्हाध्यक्ष सुरेश दादा पाटील, प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव विनोद कोळी, प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सैमिरे, प्रहार दिव्यांग तालुका सचिव भागवत शेलोळे, सुधीर पाटील,
प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रहार जनशक्ती युवा तालुकाध्यक्ष योगेश निकम, प्रहार जनशक्ती अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष वसीम शेख, ग्रामीण रुग्णालय रावेर येथील डॉक्टर एन डी महाजन. इत्यादी प्रहार दिव्यांग संघटना कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते.