रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर शाखेच्या माध्यमातून रावेर शहरातील बुद्धनगरी, स्टेशन रोड, रावेर येथील लुम्बिनी बुद्ध विहार येथे वर्षावास मालिकेची सुरुवात करण्यात येऊन वर्षावास निमित्त दिनांक ४ जुलै २०२३ ते १३ जुलै २०२३ या कालावधीत १० दिवसीय महिला उपासिका प्रशिक्षण शिविराचे उद्घाटन करण्यात आले. कार्य क्रमांच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभा रावेर शहर अधक्ष आयु. राहुल डी गाढे हे होते. तर प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रिय शिक्षिका आयु. माननी करूणाताई नरवाडे हे आहेत.[ads id="ads1"]
सर्व प्रथम तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून मेनबत्ती प्रज्वलित करून त्रिसरण पंचशील घेण्यात आले. शिबिराचे रितसर उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमाला महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या केंद्रिय शिक्षिका करूणाताई नरवाडे, भारतीय बौद्ध महासभा रावेर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र अटकाळे, रावेर शहर शाखेचे अध्यक्ष राहुल डी.गाढे, सरचिटणीस विशाल तायडे, कोषाधक्ष यशवंतराव कोंघे, कार्यालयीन सचिव धनराज घेटे, वंचितचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, केंद्रिय शिक्षक संघरत्न दामोदरे, विजय भोसले, बौद्धचार्य गौतम अटकाळे, संतोष तायडे, महेंद्र वानखेडे, वामन तायडे, राहुल लहासे, मनोहर ससाणे, कुणाल भालेराव तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
सदर महिला उपासिका शिबिरात एकुण ४८ महिलांनी सहभाग घेतला आहे. १० दिवस हे शिबिर चालणार असून केंद्रिय शिक्षिका करुणाताई नरवाडे हया महिलांना प्रशिक्षण देणार आहेत.