रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात मतदार जनजागृती निमित्ताने प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी लोकशाहीत मतदान करणे खुप महत्वाचे असते म्हणून सर्वांनी मतदार यादीत आपल्या नांवाची नोंदणी करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे मतदान प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.या प्रसंगी मतदार नोंदणी फॉर्म चे वाटप नवमतदारांना करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मा.तहसीलदार श्री बंडू कापसे व नायब तहसीलदार श्री आर. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच रावेर तहसील कार्यालयातील कर्मचारी विक्रम राठोड व सुलेमान तडवी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बाविस्कर यांनी केले.