ऐनपुर येथे शेतकरी परिसंवादाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुका प्रतिनिधि- विनोद हरी कोळी
ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात केळी तंत्रज्ञान विस्तार केंद्रामार्फत शेतकरी परिसंवादाचे आयोजन दिनांक 13/07/2023 रोजी करण्यात आले. सदर परिसंवादाचे अध्यक्ष स्थान मा.श्री.दत्तात्रय तुकाराम महाजन यांनी भूषविले. [ads id="ads1"]

  कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री बंडू कापसे तहसीलदार, रावेर ,मा. श्री बी पी वाळके, तालुका कृषी अधिकारी, संस्थेचे चेअरमन माननीय श्री श्रीराम नारायण पाटील, उपाध्यक्ष मा.श्री आर एन.महाजन संचालक मा. श्री हरी भिका पाटील , मा श्री एन व्ही पाटील, मा.श्री विकास भाऊ महाजन , डॉ सतीष पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. परिसंवादास मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष मा. श्री महेशजी ढवळे लाभलेले होते.[ads id="ads2"]

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री आर एन महाजन यांनी सादर केले तर मनोगत प्रा. व्ही एच पाटील यांनी व्यक्त केले .आजच्या काळात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळणे अत्यावश्यक असून पिकांची फेरपालट, माती परीक्षण करून खतांची मात्रा देणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना करावी व आपल्या मालाची विक्री स्वतः करावी असे विचार आपल्या मनोगतात मा. श्री महेश ढवळे यांनी शेतकऱ्यांशी हितगुज करताना व्यक्त केलेत. सूत्रसंचालन मा.श्री एन व्ही पाटील सर यांनी तर आभार मा. श्री विकासभाऊ महाजन यांनी मानले. सदर परिसंवादास परिसरातील एकूण 66 शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सन्माननीय चेअरमन मा. श्री श्रीराम नारायण पाटील ,उपाध्यक्ष मा.श्री आर एन महाजन , मा. हरी भिका पाटील मा.श्री एन व्ही पाटील, मा.श्री विकास भाऊ महाजन, डॉ सतीष पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ. एस.ए. पाटील ,प्रा. डॉ. एस बी पाटील, प्रा. डॉ.पी.आर महाजन, प्रा. डॉ. एस एन वैष्णव , प्रा. एच एम बाविस्कर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!