ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर ता. रावेर दि.१८/०७/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पुनर्वसन संघर्ष समिती ऐनपुर यांनी स्मशानभूमीत भुमिगत आंदोलन केले.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथे पुनर्वसन संघर्ष समितीमार्फत हतनूर धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे ऐनपुर गावातील तिन्ही बाजूंनी फुगोट्याचे पाणी मोठ्या प्रमाणात साठलेले आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांची घरे फुगोट्याच्या पाण्यापासून अगदी १५ ते २० फुट अंतरावर आहे त्यामुळे या घरांना जमिनीतून ओलावा लागलेला असून घराच्या भिंती उन्हाळ्यात सुद्धा ओल्या असतात त्यामुळे हे घरे केव्हा पडतील हे सांगता येत नाही.[ads id="ads1"]
या भागात यामुळे दलदल निर्माण झालेली असून यामुळे डास, जनावरे,सर्प, घोणस ,नाग, अजगर व मगरासारखे हिंस्र जलचर प्राण्यांपासून जिवितास धोका निर्माण झाला आहे या भागाची पाहणी पुनर्वसन विभाग व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेली असून या परीसरातील २५० घरे ही रेड झोन मध्ये आहे ही घरे तात्काळ उठवली जावी यासाठी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून भागातील संबंधित मंत्री, आमदार, खासदार स्थानिक व जिल्ह्यातील अधिकारी यांना कल्पना आहे या साठी वेळोवेळी पुनर्वसन अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ऐनपुर येथील स्मशानभूमीत भुमिगत आंदोलन केले.[ads id="ads2"]
यावेळी दिपराज बागुल सहाय्यक कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग १, प्रेमसागर कळमकर कनिष्ठ अभियंता मध्यम प्रकल्प विभाग १, युवराज ढाके स्थापत्य सहायक मध्यम प्रकल्प विभाग १ व रावेर चे तहसिलदार बंडू कापसे यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण सोडले
हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर
हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..
या उपोषणात पुनर्वसन संघर्ष समिती चे अध्यक्ष सुधाकर विठ्ठल महाजन, उपाध्यक्ष शेख हारून, सचिव अनिल वाघोदे संदिप महाजन, जगन्नाथ महाजन, प्रमोद पाटील, युसुफ शेख, चंद्रगुप्त भालेराव,शरद अवसरमल, गोपाल बारी, रामदास पाटील, हुसेन शेख, सरपंच अमोल महाजन,अनिल जैतकर, सुनिल खैरे, अतुल पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील गोसावी, ऐनपुर मंडळाचे मंडळ अधिकारी शेलकर आप्पा, तलाठी विजय शिरसाठ शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते



