यावल येथील कासार समाजाने केला नांदेड मधील अत्याचाराचा,घटनेचा तीव्र निषेध ; यावल तहसीलदारस दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा येथील आरोपी ज्ञानेश्वर पवार याचेवर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई होणे बाबत यावल येथील कासार समाजातील प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिकांनी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन दिले.[ads id="ads1"] 

     सोमवार दि.१७ जुलै २०२३ रोजी यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की यावल व महाराष्ट्रातील संपुर्ण कासार समाजातर्फे निवेदन करतो की,मुदखेड तालुक्यातील निवघा गावातील कासार समाजाची अल्पवयीन मुलगी कु·सपना सतिष पैदे उ.व.१७ हिचा गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या याने मागील वर्ष भरात अनेकवेळा छेडछाड करुन अखेर दि.१२ जुलै२०२३ रोजी नाहक बळी घेतला.[ads id="ads2"] 

मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को(बाल लैंगीक अत्याचार)अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी यावल व संपुर्ण महाराष्ट्रातील कासार समाज करीत आहोत.

आपण तात्काळ नांदेड पोलीस अधिक्षक सो यांना आरोपी ज्ञानेश्वर पवार याच्यावर पोस्को (बाल लैंगिक अत्याचार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची सूचना करावी अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात कासार समाज आंदोलन छेडतील व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्रातील कासार समाज जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात यावल येथील सो.क्ष.कासार समाज अध्यक्ष विजयशेठ रमेश कासार,उपाध्यक्ष अशोकशेठ बाजीराव कासार,खजिनदार सचिनशेठ श्रीकृष्ण कासार व सदस्य समाज बांधव नितीन कासार,गोविंद कासार,मिलिंद कासार,चंद्रकांत कासार, विजय कासार,बबन कासार, सुभाष कासार,मुरलीधर कासार,विनोद कासार,सचिन कासार,यश कासार,प्रेम  कासार,धनंजय कासार,अमोल कासार,मनीष कासार,सुरज कासार,परेश कासार,वैभव कासार,प्रशांत कासार,पंकज कासार,वसंत कासार,भरत कासार,नितीन कासार,संतोष कासार यांनी दिलेल्या निवेदनावर आपली स्वाक्षरी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!