प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथे तालुका आरोग्य अधिकारी यांची भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथे यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजु याकूब तडवी यांनी संध्याकाळी सहा वाजता भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण आरोग्य कर्मचारी यांच्या कामकाजाची पाहणी केली व आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे पुरवण्याच्या सूचना दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा देऊन रुग्णांना सभ्यतेने वागणूक देण्यात यावी असेही त्यांनी आरोग्य कर्मचारी वर्गाला प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथिल भेटी दरम्यान नागरिकांना अपूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाची गय केली जाणार नाही.असे त्यांनी कर्मचारी वर्गाला ठणकावून सांगितले.[ads id="ads1"] 

यादरम्यान   प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथे भेटी दरम्यान आरोग्य कर्मचारी यांना  पाऊसाळ्यास सुरुवात झाली असुन साथरोग / कंटेनर सर्व्हेक्षण / ताप रोग सर्व्हेक्षण नियमित सुरु ठेवावे.

(1) साथरोग साठी :- OT Test पाणी नमुने /TCL नमुने रजिस्टर अपडेट ठेवावे.

(2) किटक जन्य आजारासाठी कंटेनर रजिस्टर पूर्ण ठेवावे. डास उत्पत्ती स्थाना मध्ये गप्पी मासे सोडावे. सर्व ग्रामपंचायतीला मान्सून पूर्व पत्र व्यवहारा करून खालील इतर सूचना द्याव्या.[ads id="ads2"] 

कारण जुलै/ आगस्ट/ सप्टेंबर मध्ये जलजन्य आजारात वाढ होत असते.तरी नियमित TCL युक्त पाणी पुरवठा करणे पिण्याची पाण्याच्या टाक्या स्वच्छ धुणे त्यावर झाकण असणे तसेच पाणी शुद्धीकरण करूनच गावास पाणी पुरवठा करावा तसेच गावातील गटारी वाहत्या करणे तसेच गावात स्वच्छता ठेवणे विषयी ग्रामपंचायतीला वेळोवेळी सूचना लेखी स्वरूपात द्याव्या. गावातील व्हाल गळती, पाईप लाईन लिकेज गटारी स्वच्छ करण्याविषयी लेखी पत्र व्यवहार देण्यात यावे.

त्यासाठी अधिनस्त गावांमध्ये कोणत्याही प्रकारे साथ लागणार नाही यांची दक्षता द्यावी. व तसा अहवाल वेळोवेळी  यावल तालुका अधिकारी कार्यालयास सादर करावा.अश्या महत्व पूर्ण सूचना देण्यात आल्या यावेळी भालोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, तालुका आरोग्य सहाय्यक जयंत पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र भालोद येथिल आरोग्य सहाय्यक पालवे, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!