रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 11 जुलै रोजी नवीन रेस्ट हाऊस सावदा रोड रावेर येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या बैठकीमध्ये श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गायरान जमिनी संदर्भात मुंबई येथे विधान भवनावर विराट असा मोर्चा निघणार असून या मोर्चासाठी आपल्या तालुक्यातील गायरान धारक यांना या मोर्चासाठी दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी मुंबई येथे जाण्याचे आयोजित केले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.[ads id="ads1"]
तरी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी युवक आघाडीचे पदाधिकारी आजी-माजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे जिल्हा उपाध्यक्ष तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकळे इत्यादींनी आवाहन केले आहे.