जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व चे चिंतन शिबिर 'यशवंत भवन' मध्ये उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. [ads id="ads1"]
त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याकडून मार्गदर्शनासाठी नियुक्त करण्यात आलेले विभागीय सचिव के वाय सुरवाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर 17 जून रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्राकडून नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली होती त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर मुख्य मार्गदर्शक के वाय सुरवाडे यांनी चिंतन शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करून सविस्तर माहिती दिली. [ads id="ads2"]
यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका यांची आचारसंहिता, पर्यटन प्रसार प्रचाराचे कार्य, संस्कार विभागाचे कार्य, वेगवेगळे शिबिर कसे घेण्यात यावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नंतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस आनंद ढिवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव यांनी मांडले.