सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा न.पा.उर्दु मुला/मुलींची शाळा असून,याचे वर्ग खोल्या सह इमारत दुरुस्ती व बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावे.याबाबत दि.८ जुलै २०२३ रोजी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ.चंद्रकांत पाटील यांना समक्ष भेटून शहरातील समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.असता सदरील काम एका महिन्यात सुरू करण्यात येईल असे आ.चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला ठोसपणे सांगितले.[ads id="ads1"]
याबाबत अधिक माहिती अशी की,पावसाळ्यात सदरील शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी गळती होते.या मुळे येथील लहान विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या अनुषंगाने पालक वर्गाच्या मागणीनुसार जुलै २०२२ मध्ये आ.चंद्रकांत पाटील यांनी या शाळेस भेट दिली होती.शाळा इमारत व वर्ग खोल्याची अतिशय दयनीय अवस्था बघून,त्यांनी याची दुरुस्ती व बांधकाम जलदगतीने मार्गी लावण्याचे नुसते आश्वासन न देता तात्काळ पुरेसा निधी देखील दिलेला होता.पंरतु एक वर्ष उलटूनही कामाची सुरुवात झाली नसल्याने पुन्हा पावसाळा सुरु झाला यामुळे शाळा वर्ग खोल्यांमध्ये प्रचंड पाणी गळती सुरू झाली.[ads id="ads2"]
याचा त्रास येथील १ ली ते ७ वीच्या लहान विद्यार्थ्यांना पुन्हा सहन करण्याची वेळ आली.तरी ही समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी आ.चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना आदेश द्यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे सावदा येथील समाजसेवक सोहेल खान,फरीद शेख,युसूफ शाह,शेख निसार,शेख अनिस उर्फ अन्या,शेख कमरूद्दीन,शेख कलीम,शेख चाँद,शेख आबिद,शेख मोहसिन,यांच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी शाळा वर्ग खोल्याचे काम एका महिन्यात सुरू करण्यात येईल,असे ठोसपणे सांगितले आहे.