रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शहरातील जुना सावदा रोड वरील नागझिरी पुलाच्या बांधकामाला येत्या आठ दिवसात सुरुवात होऊन सहा महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.[ads id="ads1"]
या नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झालेल्या माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांच्या कुटुंबीयांची मंत्री महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले. तहसीलदार बंडू कापसे यांनी पुरात रावेर तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री महाजन यांना यावेळी दिली.
त्यावेळी आर्थिक मदतीचे तिघांचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना रावेर तहसीलदार यांना ना.गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत.[ads id="ads2"]
त्यानंतर त्यांनी या नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाची पाहणी केली. यावेळी भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपचे उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सी एस पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती जितू पाटील, तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, युवा मोर्चाचे अमोल पाटील, योगेश गजरे, प्रवीण पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.