(सुवर्ण दिप वृत्तसेवा) जोगलखोरी ता.भुसावळ येथील जि प शाळा शाळेत श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ ,सुरभी नगर भुसावल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना संघा चे अध्यक्ष आर आर बावस्कर माजी मुख्य आभियांता यांचेकडून विद्यार्थ्यांना पाट्या ,पेन्सिल तर डॉक्टर अशोक पाटील यांचे कडून प्रत्येकी एक पेन , सुपडू शंकर कुरकुरे यांचे कडून प्रत्येक मुलास एक मोजपट्टी व उजळणी पुस्तिका ,सल्लागार दिनकर जावळे यांच्याकडून प्रत्येकी एक शिसपेन्सिल व रबर ,संघाच्या सहसचिव डॉक्टर सुधा खराटे यांचे तर्फे त्यांचे वडील कै सिताराम चैत्राम पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त बिस्कीट पुडे इ साहित्याचे वाटप करण्यात आले. [ads id="ads1"]
साहित्य स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाध्यक्ष आर आर बावस्कर होते .या कार्यक्रमास संघा चे उपाध्यक्ष पोपटलाल पाटील, सचिव मधुकर तिडके, कोषाध्यक्ष शांताराम बोबडे ,सल्लागार दिनकर जावळे,कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अशोक पाटील ,कार्यकारिणी सदस्य देवराम पाटील ,संघाचे सभासद भानुदास बऱ्हाटे , गोपाल वाणी , सुपडूशंकर कुरकुरे , शालिग्राम पाचपांडे उपस्थित होते.[ads id="ads2"]
दिनकर जावळे , पोपटराव पाटील ,अध्यक्ष आर आर बावस्कर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छता विषयक सवयी अध्ययन व शिस्त याबाबतीत मार्गदर्शन केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील महाजन ,सहाय्यक शिक्षक दीपक पाटील, ग्रामस्थ , हेमांगी चौधरी यांचे सहकार्य लाभले. फोटो छायाचित्रण विकास सोनवणे यांनी केले तर दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.