यावल तालुक्यातील कोळवद येथे विजेच्या शॉक लागून बैल जोडीचा दुर्दैवी मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यातील कोळवद येथील रहिवासी सुनील अशोक चौधरी हे सकाळी शेतात मजूर घेऊन बैलगाडीवर शेतात काम करण्यासाठी गेले असता शेतातून घरी परत येताना रस्त्यात इलेक्ट्रिक पोल मध्ये वीज पुरवठा उतरल्याने बैलजोडीला शॉक लागून बैलजोडी जागेवरच मृत्युमुखी पडली.[ads id="ads1"] 

      आज मजूर वर्ग व शेतकरी यांनी बैलजोडीच्या साह्याने पेरणी केली त्यानंतर पावसाचा मौसम झाल्यामुळे ते परत घरी येत असताना त्यांच्या शेताकडील रस्ता हा अत्यंत खराब असल्यामुळे त्या ठिकाणी दुसरे वाहन जात नसल्यामुळे त्या शेतात ये जा करण्यासाठी बैल जोडीचा वापर करावा लागत असतो दुपारी ३ वाजता ते शेतातून बैलजोडी लाकडी गाड्यावर मजूर घेऊन परत येत असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलच्या तणाव्यात वीज प्रवाह उतरलेला असल्याने व त्या पोलवरती तणाव्याची सुरक्षितेसाठी लावलेली चिनी साहित्य हे काही कारणास्तव तुटल्यामुळे त्या  खांबाला व खांब्याच्या तनाव्यात वीज प्रवाह असल्यामुळे लाकडी बैलजोडी गाडीवर ५ ते ७ महिला व पुरुष बसले होते त्यात त्यांना सुद्धा विजेचा काही प्रमाणात शॉक लागला त्यांनी तातडीने बैलगाडीवरून उड्या मारल्या व त्यांचे प्राण वाचवले बैल जोडीला विजेचा शॉक लागल्यामुळे बैल जोडी जागेवरच मृत्युमुखी पडली.[ads id="ads2"]  

  यात सुनील अशोक चौधरी यांचे अंदाजे १ लाख रुपयाचे नुकसान झाले,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, शेतकरी वर्ग आधीच नैसर्गिक संकटात असल्यामुळे, शेतीमालाला भाव नसल्यामुळे त्रस्त झालेला आहे त्यामुळे कोळवद येथील बैलजोडी मालक शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी असे तालुक्यात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!