नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून आमदार आपल्या दारी एक महा शिबिर राबविण्यात येत असून दिनांक एक जुलै 2023 रोजी शनिवारी नांदगाव येथे नगरपालिकेसमोरील शिवस्मृती मैदानावर आमदार आपल्या दारी महा शिबिर संपन्न झाले. गेल्या महिनाभरापासून नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत विविध शासकीय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहे.
यामध्ये नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे, विविध आजारावरील उपचार औषधे, रक्त तपासणी करून दिली जात आहे. रेशन कार्ड संबंधित अडचणी, नवीन रेशन कार्ड, दुय्यम रेशन कार्ड विविध प्रकारचे निराधार दाखले व इतर दाखले या ठिकाणी काढून दिले जात आहेत
दिनांक एक जुलै 2023 रोजी नांदगाव येथील शिवस्पुर्ती येथे संपन्न झालेल्या आमदार आपल्या दारी या शिबिरामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये नांदगाव नगरपालिका, शासकीय रुग्णालय नांदगाव, महावितरण, भुमिअभिलेख, पंचायत समिती आणि तहसील असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. नांदगाव शहरांमध्ये तीन शिबिरे होणार असून दिनांक एक जून 2023 रोजी चे रोजीचे शनिवारचे हे पहिले शिबिर शिवस्पुर्ती मैदान नांदगाव नगरपालिकेसमोर संपन्न झाले. नांदगाव शहरांतर्गत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरास उपस्थिती लावली. तसेच विविध सुविधांचा लाभ घेतला.
नांदगाव शहरांमध्ये विविध प्रकारचे मोफत सुविधा महा शिबिर पहिल्यांदाच होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सुहास अण्णा कांदे यांच्या धर्मपत्नी अंजुमताई सुहास कांदे , उज्वलाताई खाडे, मुख्याधिकारी विविध धांडे, डॉक्टर तुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विष्णू निकम सर, प्रमोद बाबर, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान खान, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, शहर प्रमुख सुनील सोनवणे, सागर हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कान्हा कलंत्री, अमोल नावंदर, दीपक मोरे, आनंद कासलीवाल, बाळासाहेब शिवरे, साईनाथ पवार, प्रदीप कासलीवाल, रमेश काकळीज, भास्कर कासार, बाळासाहेब कवडे, वामन पोद्दार, मुन्ना शर्मा सर, राजाभाऊ पवार, भाऊराव बागुल, संजय आहेर, एन के राठोड, संजय सानप, डॉक्टर संजय चव्हाण, शशी सोनवणे, संतोष भोसले, कपिल तेलोरे, युवा सेना शहर प्रमुख मुजजु शेख, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, ज्ञानेश्वर खैरनार, भाऊराव पाटील, राजाभाऊ गुप्ता, महेंद्र गायकवाड आदींसह शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रोहिणी मोरे, तबसुम सय्यद, भारती बागोरे, सोनीया सोर, रेणुका बाहीकर उपस्थित होत्या. एडवोकेट सचिन साळवे यांनी सूत्रसंचालन केले.


