सोमवार दि.3 रोजी सावदा येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भा.ज.पा.पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  (सुरेश पाटील)

यावल तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख बाजार समिती संचालक जि.प.,प.स.सदस्य,खरेदी विक्री संघ संचालक, नगरसेवक,सरपंच,चेअरमन विकासो संचालक,दुध संघ संचालक,माजी जिल्हा बॅक संचालक,ग्रामपंचायत सदस्य,लोकप्रतिनिधी पदाधिकारी,कार्यकर्ते बंधू भगिनी यांना कळविण्यात येते की भारतीय जनता पार्टी रावेर लोकसभा क्षेत्र कार्यकर्ता मेळावा सावदा येथें सोमवार दि 3.जुलै 2023 रोजी सावदा येथें दुपारी 2 वाजता कुलसुमबाई मंगल कार्यालय येथें भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे,सदर मेळाव्यासाठी मा. ना.गिरीषभाऊ महाजन ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस मा.विजयभाऊ चौधरी,भारतीय जनता पार्टी  जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे,खासदार श्रीमती.रक्षाताई खडसे,रावेर लोकसभा प्रमुख नंदुभाऊ महाजन,जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी,शरददादा महाजन,रावेर विधानसभा प्रमुख अमोलदादा हरीभाऊ जावळे,सौ.कांचनताई फालक,जिल्हा सरचिटणीस हर्षलभाऊ पाटील.जिल्हा चिटणीस सौ.सविताताई भालेराव,यावल तालुक्यातुन उपस्थित राहणार आहे तरी तालुक्यातुन सर्व पदाधिकारी,कार्यकत्यानी उपस्थित रहावे असे आवाहन यावल तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल तालुका सरचिटणीस विलासभाऊ चौधरी, उज्जैनसिंग राजपुत यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!