विवरे ता.रावेर (समाधान गाढे)
रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे आज दिनांक २जुलै रविवारी रोजी सकाळच्या सुमारास रस्त्यावर झालेल्या चिखलाने रिक्षाचा अपघात होऊन दोन जण किरकोळ जखमी झाल्याने, विवरे बुद्रुक गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट विवरे बु येथील ग्रामपंचायत कार्यालयवर थेट मोर्चा आणला होता. यावेळी सरपंचाकडून समाधानकारक दिलासा न मिळाल्याने महिलांनी ग्रामपंचायतीला थेट टाळे ठोकल्याने विवरे गावासह रावेर तालुक्यात एकाच खळबळ उडाली.
विवरे बुद्रुक येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात थेट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज रविवारी सकाळी विवरे बुद्रूक येथील आझादनगर मधील रस्त्यावर रिक्षा उलटल्याने नागरिकांचा संयम सुटला, महीला व पुरुषांनी थेट ग्रा.प.वर मोर्चा आणून आक्रोश केला. विवरे बुद्रुक चे सरपंच युनुस तडवी यांनी या परिस्थिती बाबत समाधानकारक दिलासा न दिल्याने, मोर्च्यात सहभागी महीलांनी थेट ग्रामपंचायतीला टाळे ठोकुन एकाच खळबळ उडाली. लवकरात लवकर नागरी सुविधा पुरवा अन्यथा मोठे जण आंदोलन होईल असा थेट इशारा देण्यात आला.




