रावेर तालुक्यातील सुकी नदीमध्ये एक जण बेपत्ता ; SDRF पथकाद्वारे शोधकार्य सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर  तालुक्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसला असून सुकी नदीच्या (Suki  River) पात्रातून एक तरूण बेपत्ता झाला असून याचा एसडीआरएफचे  पथक (SDRF Team) हे कसून शोध घेत असल्याचे वृत्त समोर येत आहे.[ads id="ads1"] 

संपूर्ण रावेर तालुक्यात आज  दिनांक २२जुलै रोजी सकाळपासुनच  संततधार पाऊस सुरू आहे. यातच सुकी नदीमध्ये (Suki  River) रावेर तालुक्यातील रोझोदा (Rozoda Taluka Raver) येथील एक जण वाहून गेल्याची माहीती समोर येत आहे. रावेर चे तहसिलदार (Raver Tahsildar ) बंडू कापसे हे  घटनास्थळी दाखल झाले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ (SDRF  Team) च्या वतीने कसून एवढ्या पावसातही शोधकार्य सुरूच आहे.[ads id="ads2"] 

सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील रोझोदा (Rozoda Taluka Raver Dist Jalgaon) येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण (Garbardi  Dam) परिसरामध्ये काल दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळच्या  सुमारास पोहण्यासाठी गेले ला होता.पोहत असतांना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला.सदर घटनेची माहीती रावेर चे तहसिलदार(Raver  Tahsildar) बंडू कापसे यांना मिळताच एसडीआरएफच्या पथकासह  (SDRF Team) हे घटनास्थळी पोहचले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे.

हेही वाचा:- महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिया 2023 चे फॉर्म भरण्यास "या" तारखे पर्यंत मुदतवाढ

हेही वाचा:- आयुष प्रसाद हे जळगावचे  नूतन जिल्हाधिकारी तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी असणार अंकित पन्नू

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर

हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..

 सुकी नदीला (Suki River) दोन्ही काठ भरून पाणी वाहत असुन यातच (Rozoda Tal Raver) रोझोदा येथील बेपत्ता झालेल्या  युवकाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक (SDRF  Team) शोध मोहीम राबवित आहेत. तर आज सकाळ पासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुन्हा एकदा संपुर्ण रावेर तालुक्यामध्ये  मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

रावेर तहसीलदार यांचे आवाहन 

रात्रीपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरु असून यामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहने टाकू नये अथवा उतरू नये असे आवाहन तहसीलदार बंडू कापसे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!