* संबधित प्रशासनाचे दुर्लक्ष
* रस्ता बनला ' स्वर्गद्वार '
यावल तालुका (प्रतिनिधी ) मिलिंद जंजाळे
तालुक्यातील साकळी येथे आज रोजी दुपारच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे साकळी गाव ते बसस्टँड दरम्यान च्या मुख्य रस्त्यावर तब्बल पाऊण किमीच्या परिसरात गुडघाभर तर काही ठिकाणी कमरे बरोबर पाणी साचले होते.तर या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला नदीचे स्वरूप प्राप्त झालेले होते.त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना जीवघेणा त्रास सहन करून वापरावे लागत होते.[ads id="ads1"]
पावसाच्या सरीअधून मधून जोरदारपणे बरसत होत्या त्यामुळे या रस्त्यावर पाणीच -पाणी झालेले होते.या रस्त्यावर पावसाचे पाणी नेहमीच साचते व हि समस्या कायमची आहे .त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप व हालआपेष्ठा सहन करावा लागते. या रस्त्यावरून वापरता येत नसल्याने गावाच्या मुख्य वापराची मोठी अडचण झालेली आहे. ही संपूर्ण बाब संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा या रस्त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्वतःला 'कर्तव्यदक्ष'अधिकारी म्हणून समजत असलेल्या अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.[ads id="ads2"]
तर गावातील नागरिकांच्या मुख्य वापराचा रस्ता असून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला या रस्त्याबाबत काहीएक 'सोयरेसुतक ' नाही असे दिसून येत आहे.
साकळीगाव ते बस स्टॅन्ड हा रस्ता मुख्य वापराचा रस्ता विविध अडचणींनी नागरिकांच्या वापरासाठी कायमची डोकेदुखी बनलेला आहे.मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी दयनिय अवस्था या या रस्त्याची झालेली आहे.साकळी गावासह परिसरातील गावांचा सुद्धा मुख्य वापराचा रस्ता आहे.यंदाच्या जुलै महिन्यात पाऊस चांगली हजेरी लावत असल्याने रस्त्यावरून पाणी चांगलेच वाहून निघत आहे.त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे.तर या रस्त्यावर साधारणतः पाऊण किलोमीटरच्या परिसरात गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेबरोबर पाणी साचत असते.
हेही वाचा:- महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिया 2023 चे फॉर्म भरण्यास "या" तारखे पर्यंत मुदतवाढ
हेही वाचा:- आयुष प्रसाद हे जळगावचे नूतन जिल्हाधिकारी तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी असणार अंकित पन्नू
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर
हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..
या साचलेला पाण्यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना जीवघेणा मार्ग पार करावा लागतो.साचलेल्या पाण्यात खोलगट खड्डे असल्यामुळे पाय घसरून अनेक नागरिक पाण्यात पडतात व त्यांना दुखापत होत असते. तर अनेक वाहनधारकांना सुद्धा अपघात होत असतात.त्यामुळे हा रस्ता खूप धोकेदायक बनलेला असून सदर रस्ता साकळी बसस्टँडवर पोहचणारा नसून चक्क ' स्वर्गात ' घेऊन जाणारा धोकेदायक रस्ता बनला असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासन बनले निगरघट्ट!-
साकळीगाव ते बस स्टँड हा रस्ता साकळी गावासह परिसरातील नागरिकांच्या वापराचा मुख्य रस्ता आहे तसेच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा अख्यातरिता आहे.त्यामुळे हा रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नाही व काहीच काम करायचे नाही या सबबीतून ग्रामपंचायतीला या रस्त्याबाबत काहीच उपायोजना करणे शक्य नाही अशा बेजबाबदारपणाच्या व वेळकाढू बोंबा ग्रामपंचायत प्रशासनाकडून व गावातील काही पदाधिकाऱ्यांकडून नेहमी केल्या जात असतात.ग्रामपंचायत प्रशासनाच्या आडमुठे वागण्यातून असे दिसून येते की,ग्रामस्थांनो...! तुम्ही या रस्त्यावरून कसेही वापरा.जगले...वाचले तर आम्हाला सांगा.मात्र ग्रामपंचायतीला काही एक देणे घेणे नाही.तर सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा या रस्त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी आतापर्यंत वेळ मिळालेला नाही. एकूणच यावल सार्वजनिक बांधकाम विभाग व साकळी ग्रामपंचायत प्रशासन हे निगरगठ्ठ बनलेले असल्याचे दिसून येत आहे.या रस्त्यावरून साकळीकरांचा मुख्य वापर असल्याने रस्त्याबाबत तात्पुरती उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासन यांनी सुद्धा करण्याची गरज आहे.