बुधवार दिनांक ५ जुलै २०२४ रात्री रावेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुले रावेर शहराच्या मध्यातून जाणाऱ्या नागझिरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे जूना सावदा रोडवरील पुलावरून घरी जाणाऱ्या सुधीर पाटील यांची मोटारसायकल ही या पुरामध्ये वाहून गेली होती. उशीर होऊनही घरी परत न आल्याने त्यांचा कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्यांची मोटारसायकल या पुलाखाली आढळून आली होती. [ads id="ads2"]
बुधवारी रात्रीपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध रावेर तहसीलदार बंडू कापसे, रावेरचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी यासीन तडवी, तलाठी स्वप्नील परदेशी, गुणवंत बारेला आदींसह स्थानिक पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक ऍड सूरज चौधरी, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन व त्यांचे पदाधिकारी तसेच रावेर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नातेवाईक व मित्रमंडळीतर्फे माजी नगरसेवकासाठी शोध मोहिम राबवली. अखेर ३६ तास उलटल्यानंतर शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास रावेर शहरातील आसराबर्डी भागात असलेल्या खदाणीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. बुधवारी रात्रभर, गुरुवारी पूर्ण दिवस, व पुन्हा शुक्रवारी सकाळपासून सुधीर पाटील यांचा शोध सुरु होता. अखेर ३६ तासानंतर सुधीर पाटील यांचा मृतदेह हाती लागल्यावर उपस्थितांचे डोळे पाणावले. सदर या घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.