यावल तालुका प्रतिनिधी:- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या न्याय हक्क व इतर प्रलंबित मागण्यासाठी रिपाईच्या आठवले गटाच्या वतीने यावल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार नाझीरकर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
मोर्चा रिपाई जिल्हा अध्यक्ष राजु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वा खाली काढण्यात आला. आंदोलन कर्त्यांनी सुमारे 4 तास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते संबंधित अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दणणाला होता.[ads id="ads2"]
या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी होते. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, वन विभाग अधिकारी विक्रम पदमोर, व आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, उपस्थित नसल्यामुळे व अधिकाऱ्यांशिवाय निवेदन देणार नसल्याचे घोषित केल्याने आदिवासी बांधवांनी सुमारे चार तास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.कृषी कायदा लागू करण्यात यावा, बियाणे मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांना सर्व सुविधा लागू कराव्यात, वनदावे तात्काळ मंजूर करून नावावर करून द्यावे, घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देणे आदिवासी योजनेचा लाभ मिळावेत आदिवासी पाड्यावर पाणीपुरवठा करण्यात यावा, रेशन कार्ड, रेशन धान्य, रस्ते अश्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष राजु सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विष्णू पारधे, पप्पू भालेराव, विक्रम प्रधान, सूर्यभान इंगळे, मिलिंद सोनवणे, रजिया खाटीक, सलीम पिंजारी, मंगलाबाई सावळे, छाया मेढे, चैताली वानखेडे, अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष ईश्वर इंगळे, सुनिल तायडे, श्रीकांत वानखेडे, सुदाम सोनवणे, विक्की तायडे, संजय तायडे, विलास भास्कर सह मोठ्या संख्येने रिपाईचे पदधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव मोर्चात सहभागी होते.