रावेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर ला SDRF पथक तैनात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर : गेल्या पंधरा दिवसांमध्ये रावेर  तालुक्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने तीन जणांचा मृत्यू झाला असून पुरामध्ये वाहून जाणाऱ्या चार जणांना नागरिकांनी वाचवले आहे. याची महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने (SDRF) तात्काळ दखल घेऊन रावेर येथे  राज्य आपत्ती व्यवस्थापन निवारण पथक तैनात करण्यात आले आहे. आणि हे पथक पुढील आदेश येईल तोपर्यंत हे पथक रावेर येथेच राहणार असल्याची माहिती रावेर चे तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली. [ads id="ads1"] 

५ जुलै व १९ जुलैला रावेर तालुक्यात तसेच सातपुड्यात मुसळधार पाऊस झाल्याने रावेर  तालुक्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ५ जुलै 2023 रोजी झाली आहे. तर १९ जुलै  2023 ला झालेल्या जोरदार पावसाने आलेल्या पुरामध्ये रावेर तालुक्यातील वडगाव, वाघोड येथे प्रत्येकी एक तर अजंदा येथील पुलावरील पुरात दोन जण वाहून जात होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने या चौघांना वाचवण्यात यश आले आहे. [ads id="ads2"] 

एसडीआरएफचे पथक रावेर मध्ये तैनात 

दरम्यान रावेर तालुक्यात घडलेल्या या घटनांची दखल जळगाव जिल्ह्यातीलच रहिवासी असलेल्या नैसर्गिक आपत्ती व मदत कार्य आणि पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी घेतली आहे. 

हेही वाचा : रावेर तालुक्यातील 23 वर्षीय युवकाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी भरती ; कुठे किती जागा पहा सविस्तर

हेही वाचा : मनात जिद्द बाळगून रिक्षाचालकाची लेक बनली पोलीस उपनिरीक्षक..

त्यांनी संभाव्य काळासाठी २० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक थेट धुळे येथून रावेर या ठिकाणी पाठवले आहे. हे पथक आज दिनांक  20 जुलै गुरुवारी रावेर येथे पोहचले आहे. रावेर चे तहसीलदार बंडू कापसे यांनी रावेर मध्ये दाखल झालेल्या पथकाशी चर्चा करीत  त्यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

#रावेर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत बाधित शेती व घरांना भेटी देऊन नुकसानीची जिल्हाधिकारी श्री. अमन मित्तल यांनी पाहणी केली. बाधित कुटुंबांना धीर दिला, पंचनामे व मदत अदा करणेचे नियोजनाचा आढावा घेतला.
रावेर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत बाधित शेती व घरांना भेटी देऊन नुकसानीची जिल्हाधिकारी श्री. अमन मित्तल यांनी पाहणी केली. बाधित कुटुंबांना धीर दिला, पंचनामे व मदत अदा करणेचे नियोजनाचा आढावा घेतला.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!