"पावसाळ्यातील पर्जन्यमानाचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही.तरी देखील न.पा.हद्दीतील पूर्वपार नैसर्गिक नाल्यांची अशा प्रकारे विकासाच्या नावाखाली तर कधी नाल्यास लागून शेत जमीनीस बिनशेती मंजुरीसाठी त्यांचे गटारीकरण केले जात असून नाल्यांची नैसर्गिक उंची व रूंदी घटत असून दर पावसाळ्यात पुरजन्य प्रसंगाला जनतेला समोर जावे लागत असल्याचे एकमेव कारण म्हणजे भविष्याची काळजी न बाळगणारे यंत्रणेचे अधिकारी व धृतराष्ट्रची भुमिका घेणारे लोकसेवक कारणीभूत असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.[ads id="ads1"]
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- संपूर्ण रावेर तालुक्या सह सावदा व परिसरात आज दि.१९ जुलै रोजी सकाळी ७ ते दुपारचे ४ वाजेपर्यंत सतत मुसळधार पाऊस पडल्याने सर्वत्र ठिकाणी पुरजन्य वातावरणात निर्माण होवून जनजीवन विस्कळित झाले होते.
या मुसळधार पावसामुळे सावदा येथील चर्मकार कुंड कडून मरी माता मंदिर समोरुन शहरातून इच्छित स्थळी वाहुन जाणाऱ्या पुर्वपार पासूनचा नैसर्गिक नाल्यांची शहर विकासाच्या नावाखाली भविष्यात काय गंभीर स्थिती निर्माण होईल पावसाळ्यातील पाण्याचा पर्जन्यमाना बाबत काळीमात्र विचार न करता स्थानिक नगरपालिका प्रशासनाने या नैसर्गिक नाल्यांचे रूपांतर थेट गटारीत करून उर्वरित जागेत कॉंक्रिटीकरण करून रस्ता तयार केल्यामुळे या नाल्याची नैसर्गिक उंची व रूंदी कमी झाल्याने अशा प्रकारे पडलेल्या मुसळधार पाऊसाचे पाणी इच्छित स्थळी वाहण्यास पुर्वी होता तसा मोकळा मार्ग न उरल्याने पुरजन्य भयावह स्थिती सावदा येथे निर्माण झाली होती.तरी या भागातील गोरगरीब रहिवासी नागरिकांच्या घरात नाल्यांचे पाणी भरून गेल्यामुळे याचा अधिक त्रास त्यांना सहन करावा लागला असून,[ads id="ads2"] अशीच समसमान स्थिती सावदा न.पा.हद्दीतील पताळ गंगा,फैजपूर रस्त्याकडील नविन प्लाटी भागातील नैसर्गिक नाल्यांची बनलेली असल्याने याचा मोठा फटका सदरील परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांना अनेक वर्षांपासून दर पावसाळ्यात बसत होता व आहे.अशा वेळी स्थानिक लोकसेवक या जनतेच्या जीवावर बेतणाऱ्या प्रसंगा वेळी आवर्जून उपस्थित राहून फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःहून गोरगरीब जनतेला कोतीच आर्थिक मदत न करता सदर ठिकाणांची सध्या स्थितीची पाहणीसाठी आलेले महसूल व न.पा.विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त(पंचनामे) करण्याचे सांगतानाचे छायाचित्र प्रसिद्धीसाठी काढून मोकळे होतात.दुसऱ्या दिवशी पंचनामे देखील केले जाते मात्र यानंतर सर्व काही वाऱ्यावर सोडून पुन्हा जनतेस बघण्यास वेळ मिळत नाही असेही लोकांकडून बोलले जात आहे.