रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडी तालुका जिल्हा जळगाव पूर्व येथून गायरान जमिनी संदर्भात व अतिक्रमित गावातून मुंबई येथील विधान भवनावर भव्य मोर्चा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 20 जुलै ला निघणार असून[ads id="ads1"] दिनांक 19जुलै रोजी कुशीनगर एक्सप्रेस ने जवळ जवळ 150 ते 175 इतके रावेर तालुक्यातील खेड्यापाड्यातील गायरान जमीन धारक महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर, तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, कंदर सिंग बारेला, शेख इमरान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथे रवाना झाले.