![]() |
मोर नदीचे पाणी पाहण्यासाठी व पर्यायी व्यवस्था करण्यासाठी यावल तहसीलदार मोहन माला नाझीरकर आणि महसूल अधिकारी, कर्मचारी व काही ग्रामस्थछायाचित्रात दिसत आहे. |
यावल ( सुरेश पाटील) तालुक्यात फैजपूर परिसरातून जाणाऱ्या मोर नदीला आलेल्या पुरामुळे वनोली कोसगाव गावचा संपर्क तुटला आहे पुलावरून सुमारे पाच ते सहा फूट पाणी वाहत आहे त्या ठिकाणी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास यावल तहसीलदार मोहन माला नाझीर कर निवासी नायब तहसीलदार विनंते सुयोग पाटील वनोली तलाठी व महसूल ची टीम यांनी भेट दिली.[ads id="ads1"]
त्यावेळी वनोली येथे सरपंच प्रकाश चौधरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला रात्री आठ वाजेच्या सुमारास कोसगाव च्या नव्या उंच पुलावरून पाच फूट पाणी असल्यामुळे रहदारी बंद करण्यात आलेली होती त्यामुळे पारदर्शक गावाकडे जाण्याचा रस्ता बंद झाला होता तर वनोली येथील काही बकर करी व बाहेर गावाला जाणारी वनोलीचे ग्रामस्थ आणि बकऱ्या यांना अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हळद फॅक्टरीमध्ये मुक्कामाला ठेवण्यात आले आहे.[ads id="ads2"]
त्यांची महसूल प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांनी दिली तसेच जिल्हाधिकारी मित्तल साहेब हे सुद्धा पूरग्रस्त स्थळाची पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली.