यावल (सुरेश पाटील) तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या पाटबंधारे विभागात 35 कोटीचा भ्रष्टाचार,गैरप्रकार झाला असल्याने त्याची चौकशी होऊन कारवाई करणे बाबत नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांचा जळगाव येथील जळगाव पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर आज उपोषणाचा तिसरा दिवस परंतु पाटबंधारे विभागाने अजून पावतो कोणतीही दखल घेतलेली नाही.[ads id="ads1"]
नितीन सुरेश शिंदे सामाजिक कार्यकर्ता राहणार नशिराबाद यांनी दि. 2 मे 2023 रोजी दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे सिंचन भवन यांच्याकडे तसेच तापी पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती आणि आहे.[ads id="ads2"]
दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,क्षेत्रीय मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगांव यांचे कार्यालयास वेळोवेळी लेखी पत्र देऊन दाद मागितली आहे.मात्र ज्या कार्यकारी अभियंता जळगांव पाटबंधारे विभाग जळगांव यांचे कार्यालयाशी संबंधित तक्रार केली.त्यांचेच कार्यालयाकडे चौकशी करावयास सांगून त्यांचे म. अधिक्षक अभियंता,प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव यांनी त्यास इतर कार्यकारी अभियंता यांचे मार्फत चौकशी न करता त्यांनाच अहवाल मागून त्यास सहमती दिली व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. जे क्षेत्रीय अभियंते या गैरप्रकार व अनियमितता व भ्रष्टाचारास जबाबदार आहे त्यांनाच सेवे निवृत्ती नंतर कामावर नियुक्त करून पुरावे नष्ट व प्रकरण दाबण्यचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.क्षेत्रीय स्तरावर समाधान कारक उत्तरे व चौकशी न झाल्यामुळे मी आपल्या कार्यालयाकडे दाद मागितली आहे. तरी
आपल्यामार्फत चौकशी होऊन मला न्याय मिळावा.क्षेत्रीय पाहणीचे वेळी मला समक्ष बोलवावे असे सुद्धा दिलेल्या निवेदनात म्हटले होते आणि आहे तरीसुद्धा आज पावतो चौकशी आणि कार्यवाही झालेले नाही म्हणून गेल्या तीन दिवसापासून जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे उपोषणाचा तिसरा दिवस निघालेला असला तरी पाटबंधारे विभागाने अजून पावतो ठोस निर्णय न घेतल्याने बेमुदत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती तसेच संबंधितांनी दखल न घेतल्यास शेवटी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता नितीन रंधे यांनी दिला आहे.